महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Pravin Darekar on Fire Issue : अजून किती निष्पाप मृत्यू मुंबई महापालिकेला हवे आहेत? - प्रविण दरेकर यांचा सवाल - Taddev Fire Incident in Mumbai

ताडदेव परिसरातील भाटिया रुग्णालयाशेजारील कमला बिल्डिंग येथे आग लागलेल्या ठिकाणी ( Pravin Darekar visit Taddev fire incident ) भेट दिली. यावेळी विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर  म्हणाले, की सोसायटी इमारतींमधील अग्निरोधक यंत्रणा किती सक्षम आहे, हे तपासण्याची जबाबदारी कोणाची आहे ? महपालिका, पोलिस, अग्निशमन दल, बेस्ट या यंत्रणांशी समन्वय साधणारी यंत्रणा आपल्याकडे अस्तित्वात आहे ( Fire incident issue in Maharashtra ) का ?

प्रवीण दरेकर
प्रवीण दरेकर

By

Published : Jan 22, 2022, 10:24 PM IST

Updated : Jan 22, 2022, 10:41 PM IST

मुंबई - ताडदेव आगीच्या दुर्घटनेला सर्वस्वी मुंबई महापालिका जबाबदार आहे. आगीत अनेक निष्पापांचे नाहक जीव गेले, त्यामुळे आता असे किती निष्पाप मृत्यू महापालिकेला हवे आहेत, असे सवाल विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी आज ( शनिवारी) ( Pravin Darekar on Taddev Fire issue ) केले. ते आगीच्या ठिकाणी भेट दिल्यानंतर माध्यमांशी बोलत होते.

ताडदेव परिसरातील भाटिया रुग्णालयाशेजारील कमला बिल्डिंग येथे आग लागलेल्या ठिकाणी ( Pravin Darekar visit Taddev fire incident ) भेट दिली. यावेळी विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर म्हणाले, की सोसायटी इमारतींमधील अग्निरोधक यंत्रणा किती सक्षम आहे, हे तपासण्याची जबाबदारी कोणाची आहे ? महपालिका, पोलिस, अग्निशमन दल, बेस्ट या यंत्रणांशी समन्वय साधणारी यंत्रणा आपल्याकडे अस्तित्वात आहे ( Fire incident issue in Maharashtra ) का ?

सोसायटी इमारतींमधील अग्निरोधक यंत्रणा किती सक्षम आहे

हेही वाचा-नाशिक : 200 वर्षे जुन्या वृक्षांची कत्तल थांबणार; आदित्य ठाकरेंची आयुक्तांना आराखड्यात बदल करण्याची सूचना

महापालिकेने या विषयाकडे अत्यंत गांभीर्याने पहावे -

प्रवीण दरेकर यांनी सांगितले की, कमला बिल्डींगमध्ये आग नेमकी कुठे व कशामुळे लागली यासंदर्भात उपस्थित पोलिस अधिकारी, पालिकेचे अधिकारी, अग्निशमन दलाचे अधिकारी यांच्याकडून सविस्तर माहिती घेतली. एक-दोन दिवसात यासंदर्भात सविस्तर अहवाल देण्यात येईल. परंतु आजची आगीची घटना व मुंबईत गेल्या काही महिन्यांत घडलेल्या आगीच्या घटना पाहता ही बाब अतिशय गंभीर आहे. आगीच्या या दुर्घटनांमुळे निष्पापांना आपला जीव गमवावा लागत आहे.

हेही वाचा-Maharashtra Tableau 2022 : यंदा राजपथावर महाराष्ट्राचा चित्ररथ दाखवणार 'जैवविविधता'

भेट देऊन पाहणी करून काय उपयोग ?

मुंबई महापालिकेने या विषयाकडे अत्यंत गांभीर्याने ( Pravin Darekar demands on fire issue ) पाहिले पाहिजे. आपल्याकडे योग्य स्वरुपात फायर अर्लामिंग सिस्टिम नाही. फायर ब्रिगेडने ही दक्षता घेणे गरजेचे आहे. एखादा अपघात घडल्यांनतर अशा दुर्घटनेत निष्पाप नागरिकांचे प्राण जाणार असेल व यानंतर आम्ही येऊन भेट देऊन पाहणी करून काय उपयोग ? कारण तोपर्यंत गेलेले जीव आम्ही परत आणू शकत नाही, याकडे आता तरी मुंबई महापालिका प्रशासन व राज्य सरकार यांनी तातडीने गांर्भीयाने पाहण्याची गरज असल्याचेही दरेकर यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा-Corona Cases in Juvenile Home : शासकीय बालसुधारगृहातील १५ मुलांना कोरोनाची लागण

सर्वपक्षीय बैठक बोलवावी-

मुंबईसारख्या गजबजलेल्या शहरात तसेच उपनगरातही लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. यामुळे आगीच्या दुर्घटना रोखण्याच्या दृष्टीने परिणामकारक उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे. त्या अनुषंगाने तातडीने सर्वपक्षीय बैठक बोलविण्याची मागणी प्रवीण दरेकर यांनी केली. ते म्हणाले, की आजची आगीची दुर्घटना तसेच मुंबईत वारंवार घडणाऱ्या आगींच्या घटनांसंदर्भात विधीमंडळाच्या आगामी अधिवेशनात आवाज उठविणार आहे. या सर्व प्रकरणांची सखोल चौकशी करण्याची मागणीही अधिवेशनात करण्यात येईल. दर महिन्याला आगीच्या दुर्घटनांमुळे बळी जात असतील तर या निष्काळजीपणास जबाबदार असलेल्या संबंधितांविरुध्द कारवाई करण्याची मागणीही दरेकर यांनी केली.


रुग्णालयांच्या संवेदनाच गेल्या आहेत

सकाळी आग लागल्यानंतर जखमी रहिवाशांना उपचारासाठी काही रुग्णालयांनी दाखल करून घेण्यास नकार दिला. हे जर असे घडले असेल तर ते फार गंभीर आहे. रुग्णालयांच्या संवेदनाच गेल्या आहेत. त्यामुळे असे प्रकार जर जाणिवपूर्वक घडले असतील तर विरोधी पक्ष नात्याने याविषयाचा जाब विचारला जाईल, असेही दरेकर यांनी स्पष्ट केले.

महापौरांकडून सारवासारव
दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना मुंबई महापौरांनी पाच लाखांची मदत जाहीर केली आहे. महापालिका प्रशासन व राज्य सरकार यांची जबाबदरी संपत नाही. तर अशा दुर्घटना रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची गरज असल्याचे स्पष्ट करतानाच दरेकर यांनी सांगितले. महापौरांनी घटनास्थळी भेट दिल्यानंतर येथे सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. परंतु ही दुर्घटना कोणामुळे घडली, यासाठी कोण जबाबदार आहे. यावर भाष्य करणे अपेक्षित आहे. महापालिकेने झालेल्या चुकांची दुरुस्ती करण्याची गरज आहे असेही त्यांनी स्पष्ट केले.

Last Updated : Jan 22, 2022, 10:41 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details