मुंबई -किरीट सोमैया यांच्यावर झालेल्या हल्ल्या प्रकरणी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस ( Opposition Leader Devendra Fadnavis ) यांनी केंद्रीय गृहसचिव ( Union Home Secretary ) यांना पत्र लिहून याबाबत माहिती दिली आहे. मागील काही दिवसांपासून राज्यात कायदा व सुवेवस्था संदर्भात जी परिस्थितीत निर्माण झाली आहे, त्याबाबत तसेच भाजपा नेते किरीट सोमैया व मोहित कंबोज यांच्यावर झालेल्या हल्ल्या प्रकरणी फडणवीसांनी हे पत्र लिहिले आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला यांना लिहिलेल्या पत्रात सोमैयांवर झालेल्या हल्ल्याचा उल्लेख केला आहे. खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा यांना अटक झाल्यानंतर पोलिसांना पूर्वसूचना देऊन किरीट सोमैया त्यांना भेटण्यासाठी खार पोलीस स्टेशनला गेले होते. त्यावेळी शिवसैनिकांचा मोठा जमाव पोलीस ठाण्याबाहेर आला व त्यांच्यावर हल्ला होऊ शकतो. त्यामुळे पोलिसांनी तेथील गर्दी दूर करावी, असे सोमैया यांनी पोलिसांना सांगितले. मात्र पोलिसांनी त्यावर काहीच कारवाई केली नाही. तर त्याचा परिणाम असा झाला की सोमैया यांच्या गाडीवर दगडफेक, बाटल्या फेकून मारण्यात आले. पोलीस ठाण्याच्या परिसरात ही घटना गंभीर असल्याचे फडणवीस यांनी सांगितले आहे.