महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

'गोपीचंद पडळकर यांच्या जीवाला धोका, विशेष पोलीस संरक्षण द्या'; देवेंद्र फडणीस यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांना विशेष पोलिस संरक्षण देण्याची मागणी केली आहे. तस पत्र त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना (Fadnavis Writes To Uddhav Thackeray) लिहिलं आहे.

'गोपीचंद पडळकर यांच्या जीवाला धोका, विशेष पोलीस संरक्षण द्या'; देवेंद्र फडणीस यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
Opposition leader Devendra Fadnavis demanded police protection for Padalkar

By

Published : Nov 18, 2021, 11:36 AM IST

Updated : Nov 18, 2021, 1:08 PM IST

मुंबई - भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) सध्या एसटी कामगारांच्या प्रश्नावर प्रचंड आक्रमक झालेले पहायला भेटत आहेत. एसटी कामगारांच्या विविध संघटनांनी आपले हात या संपातून काढल्यानंतर भाजपने एसटी कामगारांच्या संपाला पूर्ण पाठिंबा जाहीर केला आहे. विशेष करून गोपीचंद पडळकर हे एस टी कामगारांच्या लढ्याच नेत्तृत्व करत आहेत. याच पार्श्वभूमीवर विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांना विशेष पोलिस संरक्षण देण्याची मागणी केली आहे. तस पत्र त्यांनी मुख्यमंत्र्यांना (Fadnavis Writes To Uddhav Thackeray) लिहिलं आहे.

देवेंद्र फडणीस यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
काय लिहिलं आहे पत्रात -फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून ही मागणी केली आहे. गोपीचंद पडळकर हे राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणाविरोधात आंदोलन करत असल्याने गोपीचंद पडळकर यांच्या जीवाला धोका आहे, असं त्यांनी पत्रात म्हटलं आहे. बहुजनांच्या बाजूने उभे राहिल्याने दुखावलेले लोक त्यांच्यावर सातत्याने हल्ला करत आहेत, असाही उल्लेख त्यांनी पत्रात केला आहे. पुढे त्यांनी म्हटलं आहे, लोकशाहीत विरोधकांचा आवाज दाबणे ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. विरोधक असो वा सत्ताधारी ज्याच्या जीवास धोका असेल, त्याला संरक्षण मिळाले पाहिजे, असं म्हणत फडणवीसांनी पत्रातून पडळकरांना विशेष पोलीस संरक्षण देण्याची मागणी केली आहे. फडणवीसांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, पोलिस महासंचालक संजय पांडे यांनाही मागणीचं पत्र पाठवलं आहे.पडळकर यांच्या गाडीवर यापूर्वी झाला आहे हल्ला -गोपीचंद पडळकर सातत्याने राज्य सरकारवर टीका करताना दिसून येतात. एसटी कर्मचाऱ्यांच्या विलीनीकरणाच्या मागणीसाठीही ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. आझाद मैदानात तळ ठोकून ते एस टी कामगारांना पाठिंबा देत आहेत. कालच पडळकर यांच्या नेतृत्वात एसटीच्या शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांचीही भेट घेतली होती. शिवाय काही दिवसांपूर्वी पडळकर आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या वादात राष्ट्रवादीच्या (NCP) कार्यकर्त्यांनी त्यांच्या गाडीवर हल्ला केला होता. याच पार्श्वभूमीवर फडणवीसांनी सदर मागणी केली आहे.
Last Updated : Nov 18, 2021, 1:08 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details