महाराष्ट्राच्या विधीमंडळात सत्ताधाऱ्यांकडून एक काळा अध्याय लिहिला गेला- फडणवीस - monsoon session
भाजपच्या 12 आमदारांना निलंबनामुळे भाजप नेते आक्रमक झाले आहेत. भाजपच्या नेत्यांनी थेट विधानसभेबाहेर प्रतिविधानसभा भरवून सरकारचा निषेध केला. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी सरकारच्या निषेधाचा प्रस्ताव मांडला.
![महाराष्ट्राच्या विधीमंडळात सत्ताधाऱ्यांकडून एक काळा अध्याय लिहिला गेला- फडणवीस देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-12369301-thumbnail-3x2-fa.jpg)
मुंबई - भाजपच्या 12 आमदारांना निलंबनामुळे भाजप नेते आक्रमक झाले आहेत. भाजपच्या नेत्यांनी थेट विधानसभेबाहेर प्रतिविधानसभा भरवून सरकारचा निषेध केला. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी सरकारच्या निषेधाचा प्रस्ताव मांडला. महाराष्ट्राच्या विधीमंडळात सत्ताधाऱ्यांकडून एक काळा अध्याय लिहिला गेला आहे. लोकशाहीची हत्या सुरु आहे. आम्हाला लक्षात आलं की भास्कर जाधव यांच्याकडून आम्हाला धोका आहे. सोमवारी शिवीगाळ त्यांनी केली आणि वरुन तेच म्हणतात की मला शिव्या दिल्या. त्यामुळे त्यांना आमच्यापासून धोका हे खोटं आहे," असा आरोप फडणवीस यांनी केला आहे.