महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

प्रतिसभागृह भरवत फडणवीसांनी वाचला आरोपांचा पाढा - फडणवीसांनी वाचला आरोपांचा पाढा

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी कामकाजावर बहिष्कार टाकला. बहिष्कार टाकल्यानंतर भाजपाने विधानसभेच्या बाहेर प्रतिसभागृह भरवले आणि सत्ताधाऱ्यांच्या विरोधात आरोपांचा पाढा वाचला.

देवेंद्र फडणवीस
देवेंद्र फडणवीस

By

Published : Jul 6, 2021, 10:47 PM IST

मुंबई - दोन दिवसीय पावसाळी अधिवेशन आज (मंगळवारी) संपले. या दोन दिवसीय अधिवेशनात 8 विधेयक मांडत ती मंजूर करण्यात आली. मात्र हे अधिवेशन विरोधकांच्या 12 आमदारांच्या निलंबनामुळे गाजले. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी कामकाजावर बहिष्कार टाकला. बहिष्कार टाकल्यानंतर भाजपाने विधानसभेच्या बाहेर प्रतिसभागृह भरवले आणि सत्ताधाऱ्यांच्या विरोधात आरोपांचा पाढा वाचला.

'मुंबई मॉडेल नव्हे हे तर मृत्यूचे मॉडेल'

कोरोना राज्यात येऊन जवळपास 17 महिने लोटले आहेत. या 17 महिन्यांच्या काळात कोरोना रुग्णांची आणि उपचारा दरम्यान मृत पावलेल्या रुग्णांच्या आकडेवारीची लपवा छपवी केल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला. फडणवीस यांनी विधानसभेच्या बाहेर दिलेल्या माहितीनुसार, एप्रिल महिन्याची मुंबईतील मृत्यूची सरासरी आकडेवारी 7648 इतकी आहे. 2021 मध्ये प्रत्यक्ष झालेले मृत्यू 14,484 इतके आहेत. अतिरिक्त कारणांमुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 6836 इतकी आहे. कोरोनामुळे झालेल्या मृत्यूची नोंद 1479 इतकी आहे. म्हणजे मुंबईत 5357 कोविडचे मृत्यू एप्रिलमध्ये दाखविलेले नाहीत, असा आरोप फडणवीस यांनी केला. तसेच फडणवीस यांनी सरकारवर टीका देखील केली आहे. फडणवीस म्हणाले, राज्य सरकार मुंबई मॉडेलचा गवगवा करत आहे. मात्र हे मुंबई मॉडेल नसून मृत्यूचे मॉडेल असल्याची टीका फडणवीसांनी केली आहे. जून महिन्यात अँटीजेनचे प्रमाण सरकारने 65% केले आणि आरटी-पीसीआर 35% केले. रुग्णसंख्या कमी करण्यासाठी अनेक खेळ केले गेले. केवळ आकडेवारीचा खेळ केला जात आहे, असा आरोपही यावेळी फडणवीसांनी केला.


'विमा कंपन्यांचे उकळ पांढरे'

सरकारकडून पिक विम्यात भ्रष्टाचार केला जातो आहे. विमा कंपन्यांशी साटेलोटे करून शेतकऱ्यांना लुटले जात आहे. मोठा घोटाळा यात आहे. तीन वर्षांत ₹13,500 कोटींचा हा फायदा विमा कंपन्यांना होणार असल्याचे फडणवीसांकडून सांगण्यात आले. तसेच 2014 पासून आतापर्यंतची पिकविम्याची आकडेवारी देखील फडणवीस यांनी वाचली आणि तफावत दाखवून दिली. विमा कंपन्यांविरोधात आंदोलन करणारे आता कुठे गेले आहेत? असा सवाल करत शिवसेनेवर निशाणा साधला.

'राज्य सरकार मुघल निझामा प्रमाणे'

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आषाढी वारीचे स्वरुप बदलले गेले आहे. एरवी पायी जाणारा पालखी सोहळा रद्द करण्यात आला आहे. मानाच्या पालख्यांना एसटीने पंढरपूरला घेवून जाणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. मात्र सरकार मुघल आणि निझामाप्रमाणे वागत असल्याचे फडणवीस यांनी म्हटले. जे वारकरी पंढरीच्या दिशेने जात आहेत, त्या वारकऱ्यांना अटक करण्याचे काम सकारकडून केले जात आहे. हे निंदनीय असल्याचे फडणवीस प्रतिसभागृहात म्हणाले.

'ठाकरे सरकार की पवार सरकार?'

2020-21 या वर्षीच्या अर्थसंकल्पातून झालेली तरतूद आणि खर्च याचा आकडा फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांसमोर मांडला. फडणवीस यांनी पक्षनिहाय हा खर्च सांगितला. शिवसेनेकडे असलेल्या खात्याला ₹54,343कोटी खर्च , काँग्रेसकडे असलेल्या खात्याला ₹1,01,768 कोटीची तरतूद तर राष्ट्रवादीकडे असलेल्या खात्याला ₹2,23,461 कोटींचा खर्च, ही आकडेवारी त्यांनी प्रसारमाध्यमांकडे मांडली. त्यामुळे हे काही ठाकरे सरकार नाही तर हे पवार सरकार असल्याचे फडणवीस म्हणाले.

'लॉकडाऊनमध्ये गुन्हेगारी वाढली'

देवेंद्र फडणवीस यांनी गुन्हेगारीचा आकडा प्रतिसभागृहात मांडला. फडणवीस यांनी सुरक्षेच्या मुद्द्यावर बोट दाखवत गुन्हेगारी 14 टक्क्यांनी वाढली असल्याचे फडणवीस म्हणाले. त्यांनी सीआयडीचा अहवाल देखील तोंडी सांगितला. यात त्यांनी 2019 मध्ये गुन्हेगारीची संख्या 3.4 लाख होती. हिच गुन्हेगारी 2020 मध्ये वाढून 3.9 लाख इतकी झाल्याचे फडणवीस म्हणाले.

ABOUT THE AUTHOR

...view details