मुंबई - भाजपच्या नेत्यांना खोट्या प्रकरणांमध्ये अडकवण्यासाठी सरकारी वकील आणि काही पोलीस अधिकारी षडयंत्र रचत असल्याचा गंभीर आरोप विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केला. या संदर्भात आपल्याकडे व्हिडिओ रेकॉर्डिंग असून सव्वाशे तासांच व्हिडिओ रेकॉर्डिंग असलेला पेन ड्राईव्ह ( Devendra Fadnavis pen drive bomb ) असल्याचा दावा त्यांनी ( Opposition leader Devendra Fadnavis accuses ) सभागृहात केला.
विधानसभेत खुलासा करण्याची केली मागणी -
विरोधकांना संपवण्याचे काम हे सरकार कधीपासून त्यासाठी पोलीस यंत्रणेचा गैरवापर सुरू असल्याचा आरोप विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी आज (मंगळवार) विधानसभेत ( Opposition leader Devendra Fadnavis in assembly ) केला. या प्रश्नावर चर्चा करताना त्यांनी सरकारवर आरोपांच्या फैरी झाडल्या. माजी मंत्री गिरीश महाजन यांना कसे फसवले जात आहे, याबाबत त्यांनी व्हिडिओ रेकॉर्डिंग विधानसभा उपाध्यक्ष यांच्याकडे सुपूर्द केले गिरीश महाजन यांना मोका लागला पाहिजे यासाठी त्यांच्यावर बनावट केस कशी दाखल होईल यासाठी सरकारी वकील यांनी रचलेले षडयंत्र त्यांनी आपल्या तोंडाने सांगितले आहे त्याबाबतचे रेकॉर्डिंग आपण सभाग्रहात दिल्याचा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला. यंत्राच्या मागे कोण आहे याचा खुलासा करावा अशी मागणी त्यांनी विधानसभेत केली.
साहेबांनी सगळ्या फाईल माझ्याकडे दिल्या -
साहेबांनी सगळ्या फाईल माझ्याकडे दिल्या असून आता आपण मी सांगतो त्याप्रमाणे करा काही नेत्यांना आपल्याला अडकवायचे आहे, असे सरकारी वकील प्रवीण चव्हाण सांगत असल्याचा आरोप फडणवीस यांनी सभागृहात केला. सरकारी वकील चव्हाण आणि सहाय्यक पोलीस आयुक्त सुषमा चव्हाण यांच्यासह पोलीस उपायुक्तांमध्ये याबाबतचे सर्व चर्चा झाली असून त्याबाबतचा व्हिडिओ आपण दिला असल्याचे त्यांनी सांगितले.
गिरीश महाजन यांना अडकवू -