महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली, विरोधी पक्षनेते अजित पवारांची टीका - राज्य सरकारने शेतकऱ्यांना मदत केली नसल्याची टीका

राज्याl जवळपास 17 लाख हेक्टरवरील पिके बाधित झाली आहेत. त्यामुळे राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी विरोधी पक्षाकडून करण्यात आली होती. Ajit Pawar Criticized State Government मात्र, राज्यसरकारने मागणी मान्य केली नाही. यावर राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम केले असल्याची टीका विधानसभा विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी केली आहे.

विरोधी पक्षनेते अजित पवार
विरोधी पक्षनेते अजित पवार

By

Published : Aug 23, 2022, 7:07 PM IST

मुंबई - राज्यांमध्ये अतिवृष्टीचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. जवळपास 17 लाख हेक्टरवरील पिके बाधित झाली आहेत. त्यामुळे राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी विरोधी पक्षाकडून करण्यात आली होती. Opposition leader Ajit Pawar मात्र, राज्यसरकारने मागणी मान्य केली नाही. मुख्यमंत्र्यांनी याबाबत दिलेल्या उत्तरावर विरोधक म्हणून आम्ही समाधानी नाही. राज्यसरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम केल असल्याची टीका विधानसभा विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी केली आहे.

विरोधी पक्षनेते माध्यमांशी बोलताना

अतिवृष्टीमुळे शालेय फी भरण्याची अडचण - अतिवृष्टीचा फटका आदिवासी समाजाला देखील बसला असून, या दिवसात आदिवासी समाजाला मजुरीची कामे देखील मिळत नाहीत. म्हणून खावटी अनुदान जाहीर करा अशी मागणी केली असताना देखील राज्यसरकारने ही मागणी मान्य केली नसल्याचे अजित पवार यांनी सांगितले. तसेच, अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना आपल्या मुलांची शालेय फी देखील भरात येत नाही. अशावेळी त्या मुलांची फी माफ करणे गरजेची असताना सरकार फी देखील माफ करत नाही असही अजित पवार म्हणाले आहेत.

शेतकरी आत्महत्या कमी होत नाहीतराज्यात नवीन सरकार आल्यानंतर शेतकरी आत्महत्या वाढल्या आहेत. सुभाष देशमुख या शेतकऱ्याने स्वतःला पेटून घेतले. आधी आपल्या शेतात गावात होणाऱ्या आत्महत्या आता विधिमंडळाच्या दारात होऊ लागल्या आहेत. ही सरकारसाठी लाजीरवाणी गोष्ट असल्याचा टोला अजित पवार यांनी लगावला आहे.

विरोधकांना धमकी देण्याचा प्रयत्नशेतकऱ्यांना मदत मिळावी यासाठी विरोधक आक्रमक असताना विरोधकांना सभागृहात धकावण्याचे काम सुरू आहे. राज्याला राजकीय संस्कृती असताना अशा प्रकारे धमकी देणे योग्य नाही. सरकारी पक्षाकडून सभागृहातच धमकी दिल्या जात असल्याचे चित्र उभे केले जात आहे, अशी टीका अजित पवार यांनी केली आहे. तसेच, शेतकऱ्यांसाठी मदत करताना कोणतेही पॅकेज राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आलेले नाही. त्यामुळे सरकार नेमकी किती मदत करणार याबाबत अजून स्पष्ट होत नसल्याचे अजित पवार यांनी यावेळी सांगितले आहे.

आम्हाला वाटत होतं आज न्याय होईलएकनाथ शिंदे गट आणि शिवसेना यांच्यात कायदेशीर लढाई आता घटनापीठाकडे वर्ग करण्यात आली आहे. आम्हाला आशा होती आज न्याय होईल. मात्र, आता घटनापीठाकडे हे प्रकरण आहे. घटनापीठ हे महत्त्वाचे आहे. तसेच, निवडणूक आयोगासमोर दोन दिवसानंतर धनुष्यबाण चिन्ह नेमके कोणाचे यावरही फैसला होईल असे मत अजित पवार यांनी व्यक्त केले आहे.

हेही वाचा -Tushar Gandhi जिवंत गांधी खटकणाऱ्यांना मारलेले गांधी जास्तच त्रास देत आहेत, तुषार गांधींंचा भाजपला टोला

ABOUT THE AUTHOR

...view details