मुंबई -नुकतच राज्यात गणेशोत्सव मोठ्या दणक्यात पार पडला. याच काळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील विविध गणेश मंडळाला भेटी देत दर्शन घेतलं. याचवरुन राज्याचे विरोधीपक्ष नेते अजित पवारांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे. गणपती दर्शनालाही काही Ajit Pawar criticized CM Eknath Shinde on Ganapati Darshan मर्यादा असायला हव्या. महत्वाच्या पदावरील व्यक्तींने इतर बाबीकडे लक्ष देणे आवश्यक असते. राज्यातील अनेक जिल्ह्यांना पालकमंत्री नाहीत. ही बाब राज्यासाठी चांगली नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी यावर लक्ष देणे अत्यंत गरजेचे आहे. अनेक मंत्री मंत्रालयात गेलेच नसल्याची माहिती आहे, हे काही योग्य नाही, अशा शब्दात अजित पवार यांनी शिंदे सरकारवर निशाणा साधला. Ajit Pawar Criticized CM Eknath Shinde
आपण नाराज नाही : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आठवे राष्ट्रीय अधिवेशन काल दिल्लीत पार पडले. मात्र या अधिवेशना वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांना भाषणाची संधीच दिली नाही. त्यामुळे अजित पवार हे पक्षांतर्गत नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. मात्र आपण नाराज नाही. काल दिल्लीतला कार्यक्रम हा राष्ट्रीय पातळीवरच्या नेत्यांचा होता. त्यामुळे त्या मंचावर राष्ट्रीय पातळीवरच्या नेत्यांनी भाषण केली. जयंत पाटील हे राज्याचे-प्रांताचे अध्यक्ष आहेत. त्या नात्याने त्यांनी तेथे भाषण केलं. तसेच कार्यक्रमाला हजारो कार्यकर्ते नेतेमंडळी जमले होते. त्यामुळे वेळेअभावी अनेक मान्यवरांना भाषण करता आली नाही. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून शरद पवार यांच्या भाषणाची आतुरता सर्वच नेतेमंडळींना होती. त्यामुळे वेळेअभावी आपण स्वतःच त्या मंचावर भाषण केलं नाही.