महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

मनसुख हिरेन, खासदार मोहन डेलकर आत्महत्या प्रकरणावरून विधानसभेत गोंधळ - मोहन डेलकर आत्महत्येवरून विधानसभेत गोंधळ

मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणावरुन विधानसभेत खडाजंगी पाहायला मिळाली. मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणात संशयाच्या भोवऱ्यात असलेले पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना अटक करण्याची मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात केली. विधानसभेत बोलताना फडणवीसांनी मनसुख हिरेन यांच्या पत्नीच्या जबाबाचा उल्लेख करत सचिन वाझे यांच्यावर गंभीर आरोप केले

assembly
assembly

By

Published : Mar 9, 2021, 3:26 PM IST

मुंबई -मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणी विरोधकांनी विधानसभेत गोंधळ घातला. सचिन वझे यांच्याविरोधात इतके पुरावे असताना 201 गुन्ह्याखाली त्यांना अटक करण्यात यावी. सचिन वझे यांनीच मनसुख यांची हत्या केल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज अर्थसंकल्पीय अधिवेशनात खळबळजनक दावा केला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशनात मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाचा मुद्दा उपस्थितीत केला आहे. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी मनसुख हिरेन यांची पत्नी विमला यांचा पोलीस जबाबच सभागृहात वाचून दाखवला.

हिरेन यांच्या संदर्भात गुन्हा दाखल झालाय त्यासोबत त्यांच्या पत्नीचा जबाब महत्वाचा आहे. त्यात म्हटले आहे, की वझे माझ्या पतीच्या ओळखीचे होते. नोव्हेंबर 2020 मध्ये सदर कार वापरली होती. 4 महिने कार वझे यांच्याकडे होती. २६ फेब्रुवारी रोजी वझे सोबत माझे पती मुंबई गुन्हे शाखेत गेले होते. हिरेन यांची चौकशी फक्त वझे यांनी केली आणि वझे यांच्या सांगण्यावरून तक्रार दाखल केली होती. चौकशी झाल्यानंतरही जो तक्रार अर्ज देण्यात आला तोही वझे यांच्या सांगण्यावरून दिला होता. वझे यांनी माझ्या पतीला अटक करायला सांगितले होते, मग दोन तीन दिवसात बाहेर काढू असे सांगितले, असा खुलासा फडणवीस यांनी केला. तसेच, 'मनसुख यांनी भावाला वकीलांशी बोलून घ्यायला सांगितले होतं. हा खून वझे यांनी केला असावा माझा संशय आहे. 2017 मध्ये एफआयआर दाखल असून 40 लाखांची खंडणी मागितली. या प्रकऱणात धनंजय गावडे, सचिन वझे यांची नावे समोर आली. मनसुख यांचे शेवटचे लोकेशनपासून मृतदेह 40 किमी दूर आढळला आहे. त्यांचा मृतदेह मुंब्य्राच्या खाडीत फेकण्यात आला. पण ओहाटी असल्यामुळे मनसुख यांचा मृतदेह बाहेर आला' असंही फडणवीस सभागृहात म्हणाले.
हे ही वाचा - कोलकाता इमारत आग : मृतदेहांची ओळख पटवण्यासाठी डीएनए चाचण्या सुरू

डेलकरांनाही न्याय मिळायला हवा -

दरम्यान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सचिन वझे यांना अटक करा, अशी मागणी करताच परिवहन आणि संसदीय कार्यमंत्री अनिल परब यांनी मोहन डेलकर यांना देखील न्याय मिळाला पाहिजे. मुंबईत आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये भाजप नेत्यांची नावे असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे मनसुख हिरेन प्रकरणासारखी या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी आम्ही करतो असे अनिल परब म्हणाले.

हे ही वाचा - बीडमध्ये अज्ञात वाहनाच्या धडकेत पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू
सभागृहात गोधळ -

मोहन डेलकर आणि मनसुख हिरेन प्रकरणावरून विरोधक-सत्ताधारी वेलमध्ये आमने-सामने दिसले. वेलमध्ये उतरत दोन्ही बाजूच्या आमदारांनी समोरासमोर येत एकमेकांविरोधात घोषणाबाजी केली. त्यामुळे आधी 10 मिनिटे आणि नंतर अर्धा तास विधानसभेचे कामकाज तहकूब करण्यात आले.

अनिल देशमुखांचे सभागृहात निवेदन -

22 फेब्रुवारीला मोहन डेलकर यांनी मुंबईत आत्महत्या केली. ते सात वेळा खासदार होते. त्यांनी सुसाईट नोट लिहिली आहे. त्यात प्रशासक प्रफुल खेडा पटेल यांच्या नावाचा उल्लेख केला आहे. त्यांना वारंवार त्रास दिला जात होता. सामाजिक जीवन उध्वस्त करण्याचा प्रयत्न केला गेला. प्रफुल्ल पटेल हे प्रसारक आहेत आधी ते गुजरातमध्ये गृहमंत्री होते.

त्यांनी सुसाईट नोटमध्ये लिहिले आहे, की मी मुंबईत आत्महत्या करत आहे. कारण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शरद पवार आणि महाराष्ट्र शासन यांच्यावर माझा विश्वास आहे. मला न्याय महाराष्ट्रात मिळेल असा उल्लेख केला आहे. पत्नी कालबेन डेलकर आणि चिरंजीव अभिनव डेलकर यांनी देखील मला पत्र लिहिलं असून त्यांनी ही प्रफुल पटेल यांच्यावर आरोप केले आहेत. मोहन डेलकर यांना महाराष्ट्रात येऊन आत्महत्या केली. या प्रकरणाची चौकशी एसआयटीमार्फत केली जात आहे. मध्यप्रदेशचे आयएसआय अधिकारी राजेश कुमार श्रीवास्तव यांनी नागपूरमध्ये आत्महत्या केली त्यांचा देखील तोच उद्धेश असावा, असं माझं मत आहे.

हे ही वाचा - 'यांची कोरोनासोबत बैठक झालीय का?'


मनसुख हिरेन ही दुर्दैवी घटना आहे. 25 फेब्रुवारीला स्फोटके सापडली होती. त्यांच्या हत्येबद्दल पत्नीचा जबाब बाहेर आलेला आहे. एटीएस या बाबतीत तपास करून सत्य बाहेर आणेल. विरोधकांकडे पुरावे असल्यास त्यांनी ते एटीएसकडे द्यावे.

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details