मुंबई -एसटी विलिनीकरण संदर्भात राज्य सरकारकडून त्रिसदस्यीय समितीचा अहवाल विधानसभेच्या पटलावर ठेवला असला तरी, आम्हाला मात्र अद्याप अहवाल मिळालेला नाही. त्यामुळे, या अहवालावर मी अद्याप कुठलेही स्पष्टीकरण देऊ शकत नाही. मात्र, महाविकास आघाडीेचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे कष्टकरी जनतेबरोबर आहे की दाऊद इब्राहिम बरोबर हे लवकरच कळणार, असे अॅड. गुणरत्न सदावर्ते म्हणाले.
एसटी विलिनीकरणाबाबत मुख्यमंत्र्यांचा अभिप्राय काय? हे महत्त्वाचे- अॅड. गुणरत्न सदावर्ते
समितीने अहवालामध्ये काय म्हटले आहे, त्यापेक्षा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एसटी विलिनीकरण संदर्भात काय मत मांडले आहे? मुख्यमंत्र्यांची भूमिका काय हे? या अहवालावरून दिलेल्या संदर्भावरून स्पष्ट होणार आहे. त्यामुळे आम्हाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे काय मत आहे, हे महत्त्वाचे असल्याचे देखील सदावर्ते यांनी म्हटले आहे.
समितीने अहवालामध्ये काय म्हटले आहे, त्यापेक्षा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एसटी विलिनीकरण संदर्भात काय मत मांडले आहे? मुख्यमंत्र्यांची भूमिका काय हे? या अहवालावरून दिलेल्या संदर्भावरून स्पष्ट होणार आहे. त्यामुळे आम्हाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे काय मत आहे, हे महत्त्वाचे असल्याचे देखील सदावर्ते यांनी म्हटले आहे. समितीचा अहवाल अद्याप आम्हाला मिळाला नसून अहवाल मिळाल्यानंतर या संदर्भात कायदेशीर काय लढाई लढता येईल यावर आम्ही विचार करू, असे देखील सदावर्ते यांनी म्हटले.
हेही वाचा -Sanjay Raut On Phone Taping Case : 'गोव्यातही शांतता! फोन टॅपिंग सुरु आहे'