मुंबई - महाराष्ट्रात ऑपरेशन लोटस वैगरे काही होणार नाही. आम्ही सरकार व्यवस्थित चालवू. महाराष्ट्रातील भाजप नेते स्वप्न पाहत आहेत, ते कधीच पूर्ण होणार नाही, असे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे. विधीमंडळातील पत्रकार कक्षात त्यांनी माध्यमांसोबत संवाद साधला, त्यावेळी आपली प्रतिक्रिया दिला.
हेही वाचा....कोरोना विषाणुच्या प्रतिबंधासाठी राज्यात आवश्यक त्या उपाययोजना - मुख्य सचिव
मध्यप्रदेशातील संभाव्य 'ऑपरेशन लोटस' महाराष्ट्रात देखील होईल, असे भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांकडून सांगण्यात येत आहे. याबाबत थोरात यांना विचारले असता त्यांनी, महाराष्ट्रातील भाजपचे नेते जे स्वप्न पाहत आहेत. ते कधीच पूर्ण होणार नाही, असे म्हटले आहे.