मुंबई - हैदराबाद येथे एका पशुवैद्यकीय डॉक्टर महिलेवर चौघांनी 27 नोव्हेंबरला बलात्कार करून तिला जाळले होते. यानंतर संबंधित घटनेचे पडसाद देशभरात उमटत होते. या आरोपींना लवकरात लवकर फाशी द्यावी, अशी मागणी होत होती. त्यातच आज सकाळी या आरोपींचा एन्काऊंटर झाल्याचे वृत्त येताच सामान्य लोकांमध्ये आनंद व्यक्त केला जात आहे. या घटनेवर मुंबईकर मुलींना काय वाटतं? याबाबतचे मत जाणून घेण्यात आले.
हैदराबाद बलात्कार प्रकरण: जाणून घ्या मुंबईतील तरुणींची मतं... - hyderabad rape case
हैदराबाद येथे एका डॉक्टर महिलेवर चौघांनी 27 नोहेंबरला बलात्कार केला. यानंतर संबंधित घटनेचे पडसाद देशभरात उमटत होते. या घटनेवर मुंबईकर मुलींना काय वाटतं? याबाबतचे मत जाणून घेण्यात आले. पाहा हा स्पेशल रिपोर्ट...
हैदराबाद बलात्कार प्रकरण: जाणून घ्या मुंबईतील तरूणींची मतं...
कायदा व व्यवस्था कडक करून लैंगिक शिक्षण आणि मुलींच्या सुरक्षिततेबाबत शासनाने चांगली व्यवस्था करावी, अशी मागणी होत आहे. तसेच एन्काऊंटरबाबत बोलताना, सर्वसामान्यांच्या दृष्टीने हे चांगले आणि न्यायी असल्याचे मत या तरुणींनी व्यक्त केले. परंतु, कायद्याच्या दृष्टीने न्याय व्यवस्थेवर प्रश्न चिन्ह उपस्थित करण्यासारखे आहे, असेही त्या म्हणाल्या.
TAGGED:
hyderabad rape case