मुंबई - व्हीपी रोड आणि नागपाडा परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येत आहे. सध्या कोरोनाच्या वाढत्या प्रमाणामुळे राज्य सरकारने काही नियम लागू केले आहेत. मात्र, या नियमांना पायदळी तुडवड लोक मोठ्या प्रमाणात या परिसरात एकत्र येत आहेत. या गर्दीचे कारण जाणून घेतल्यास एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. ही गर्दी सामान किंवा भाजी खरेदीसाठी नाही तर चक्क अमली पदार्थ खरेदी करण्यासाठी होत असल्याचे समोर आले आले.
अमली पदार्थ खरेदी करण्यासाठी तरुणांची गर्दी -
आधी मी, आधी मला द्या, हे पैसे घ्या, थोडस द्या. जरा थांबा बाजूला व्हा, असे म्हणत एकमेकाच्या अंगावर पडणारी ही गर्दी अमली पदार्थ घेण्यासाठी आहे. कोणत्याही भीतीविना या परिसरात अमली पदार्थ विकले जात आहेत. या विक्रेत्यांना पोलिसांची कोणतीच भीती नसल्याचे दिसून येत आहे. दृश्यांमध्ये ही महिला दिसते हातामध्ये कसलीशी पिशवी घेऊन चालणारी. ही अमली पदार्थ विक्रेती महिला आहे. तिच्या मागे अमली पदार्थ खरेदी करण्यासाठी तरुण गर्दी करत आहेत. हा सगळा प्रकार मोबाईलमध्ये कैद करत असताना महिलेच्या लक्षात आले. मात्र, या महिलेच्या चेहऱ्यावर कोणतीच भीती दिसत नाही. याउलट महिलेने व्हिडिओ काढणाऱ्यांना धमकावल्याचे दिसून आले.