महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

प्राण्यांच्या रुग्णालयातील ओ.पी.डी बंद; खासगी डॉक्टरांकडे जाण्याचे सल्ले - corona affects veterinary hospitals

कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सर्वत्र संचारबंदी लागू करण्यात आली आहे. कोरोनासाठी अनेक रुग्णालये सर्वसामान्यांसाठी सज्ज असताना जनावरांसाठी असणार्‍या मोठे बैल घोडा या रुग्णालयात डॉक्टर नसल्याने ओपोडी बंद ठेवण्यात आले आहे.

veterinary doctors in mumbai
प्राण्यांच्या बैलघोडा रुग्णालयातील ओ.पी.डी बंद; खासगी डॉक्टरांकडे जाण्याचे सल्ले

By

Published : Mar 30, 2020, 11:41 PM IST

मुंबई - कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सर्वत्र संचारबंदी लागू करण्यात आली आहे. कोरोनासाठी अनेक रुग्णालये सर्वसामान्यांसाठी सज्ज असताना जनावरांसाठी असणार्‍या मोठे बैलघोडा या रुग्णालयात डॉक्टर नसल्याने ओपोडी बंद ठेवण्यात आले आहे. यामुळे अनेक पाळीव प्राण्यांच्या मालकांना प्राण्यांवर उपचार न घेताच परतावे लागत आहे.

परळ येथील रुग्णालयाची ओ.पी.डी बंद ठेवण्यात आली आहे. काही खासगी डॉक्टरांचे दूरध्वनी क्रमांक रुग्णालयाबाहेर लावण्यात आले आहेत. यांच्याकडून उपचार घ्या, असे सांगण्यात येत आहे. यामुळे पाळीव प्राण्यांवर उपचार घेण्यासाठी येणाऱ्यांना माघारी फिरावे लागत आहे.

रुग्णालयाच्या गेटवर सुरक्षा रक्षक आणि प्राणी घेऊन येणाऱ्या लोकांमध्ये वाद होत आहेत. डॉक्टर नसल्यामुळे या रुग्णालयात आधीपासून उपचारासाठी दाखल असलेल्या प्राण्यांना देखील सोडण्यात येत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details