मुंबई -भाजपमध्ये गोपीनाथ मुंडे (BJP Leader Late Gopinath Munde) सारखा एकही नेता आज नाही. आज ते असते तर महाराष्ट्रात युती कायम राहिली असती. शिवसेना काय आहे, हे फक्त गोपीनाथ मुंडे यांनाच कळलं (Sanjay Raut Said Only Gopinath Munde knows what Shiv Sena is) होतं. बहुजन समाजाच नेतृत्वची सुरुवात त्यांनीच केली अशा शब्दात शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीदिनी (Shiv Sena MP Sanjay Raut Paid Tributes To Gopinath Munde) प्रतिक्रिया व्यक्त केली.
Sanjay Raut On Gopinath Munde : शिवसेना काय आहे, हे फक्त गोपीनाथ मुंडे यांनाच कळलं होतं : संजय राऊत
भाजपचे नेते स्व. गोपीनाथ मुंडे (BJP Leader Late Gopinath Munde) यांची आज जयंती आहे. त्यानिमित्त शिवसेना खासदार संजय राऊत (Shiv Sena MP Sanjay Raut) यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना आपल्या भावना व्यक्त केल्या. गोपीनाथ मुंडे आज असते तर राज्यात आज जे काही राजकारण आहे ते दिसलं नसतं, असेही राऊत म्हणाले.
दुसरीकडे, आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांचाही वाढदिवस (Sharad Pawar Birthday) आहे. त्यानिमित्त राऊत यांनी पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा (Sanjay Raut Birthday Wishes To Sharad Pawar) दिल्या. 'शरद पवार हे यशवंतराव चव्हाण (Yashwantrao Chavhan) यांच्या नंतर महाराष्ट्राला दूरदृष्टी लाभलेल नेतृत्व आहे. ते देशाचे संरक्षण मंत्री (Defense Minister)आणि कृषिमंत्री (Agricultural Minister) असताना आत्मनिर्भर भारत बनवन्यासाठी पहिलं पाऊल उचललं. जनतेशी थेट संवाद असलेले, हवेत गप्पा न मारणारे आणि आजही तरुणांना लाजवतील असं काम करणारे नेते आहेत'. असंही राऊत म्हणाले. राज्यात आज जो महाविकास आघाडीचा (MVA Government) प्रयोग महाराष्ट्रात सुरू आहे तो त्यांच्या नेतृतवात सफल झाला आहे.