मुंबई - मुंबई विद्यापीठाशी सलंग्नित महाविद्यालये आणि मान्यताप्राप्त शिक्षणसंस्थामध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मुंबई विद्यापीठाची प्रवेशपूर्व ऑनलाईन नाव नोंदणीची प्रक्रिया ही शुकवारी, 17 जुलैपासून म्हणजे आजपासून सुरू होत आहे. या प्रवेश प्रक्रिेयेत विद्यापीठाकडून केवळ ऑनलाईन नोंदणी केली जाणार असून प्रत्यक्षात प्रवेशाचे सर्वाधिकार हे संबंधित महाविद्यालयांना असल्याने विद्यार्थ्यांना संबंधित महाविद्यालयांमध्ये जाऊन प्रवेश घ्यावे लागणार आहेत.
मुंबई विद्यापीठाची ऑनलाइन प्रवेशपूर्व नाव नोंदणी प्रक्रिया आजपासून सुरू
मुंबई विद्यापीठाशी सलंग्नित महाविद्यालये आणि मान्यताप्राप्त शिक्षणसंस्थामध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मुंबई विद्यापीठाची प्रवेशपूर्व ऑनलाईन नाव नोंदणीची प्रक्रिया ही शुकवारी, 17 जुलैपासून म्हणजे आजपासून सुरू होत आहे
पदवी अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षाला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन नोंदणी करणे अनिवार्य आहे. शैक्षणिक वर्ष 2020-21 साठी मुंबई विद्यापीठाने प्रथमवर्ष बी.ए, बी.एस्सी, बी.कॉम, बी.एमएमएम, बी.एसडब्ल्यू, बीए (फ्रेंच स्टडी), बीए (जर्मन स्टडी), बॅचलर ऑफ कलिनरी आर्ट, बीए-एमए ( इंटिग्रेटेड कोर्स इन जर्मन स्टडी), बीएमएस, बीएमएस-एमबीए ( पाच वर्षीय एकात्मिक अभ्यासक्रम) , बीकॉम (फायनान्शिअल मार्केट), बीकॉम ( अकॉउन्टींग अँड फायनान्स), बीकॉम ( बँकिंग अँड इन्शुअरन्स), बीकॉम ( फायनान्शिअल मॅनेजमेंट), बीकॉम ( इन्व्हेस्टमेंट मॅनेजमेंट), बीकॉम ( ट्रान्सपोर्ट मॅनेजमेंट), बीएस्सी ( इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी), बीएस्सी (कम्प्युटर सायन्स), बीएस्सी (हॉस्पीटॅलिटी स्टडी), बीएस्सी (मायक्रोबायोलॉजी), बीएस्सी ( बायो-केमेस्ट्री), बीएस्सी (बायो-टेक्नॉलॉजी), बीएस्सी ( मेरिटाईम), बीएस्सी (नॉटीकल सायन्स), बीएस्सी (फॉरेन्सिक सायन्स), बीएस्सी (होम सायन्स), बीएस्सी ( एरॉनॉटिक्स), बीएस्सी (एव्हीएशन), बीएस्सी (ह्युमन सायन्स), बीव्होक (टी अँड एचएम, आरएम, एफएम अँड एस, आरईएम, एमपी, एमएलटी, ग्रीन हाऊस मॅनेजमेंट, फार्मा एनेलिटिकल सायन्स, टूरिझम अँड ट्रॅव्हल मॅनेजमेंट, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट) आणि लायब्ररी सायन्स अशा अनुदानित आणि विनाअनुदानित अभ्यासक्रमांसाठी प्रवेशपूर्व ऑनलाईन नोंदणी अनिवार्य आहे.
ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी विद्यार्थ्यांनी सर्वप्रथम मुंबई विद्यापीठाच्या mum.digitaluniversity.ac या संकेतस्थळावरील ( click on-Mumbai University Pre Admission online Registration 2020-21) या लिंकवर क्लिक करून अर्ज करावा लागणार आहे. अर्ज कसा करावा, यासाठीची माहितीही विद्यापीठाच्या या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे.