मुंबई -कोरोनाचे संकट टळण्याची वाट न पाहता मुंबई आणि परिसरातील शाळा ऑनलाईन सुरू करण्यासाठी शिक्षण विभागाने कंबर कसली आहे. यासाठीच तब्बल २० हजार ३३८ शिक्षकांना ऑनलाईन शिक्षण कसे द्यायचे यासाठीचे ट्रेनिंग दिले जात आहे. राज्यात १५ जूनच्या दरम्यान सर्व शाळांमध्ये ऑनलाईन शिक्षण सुरू केले जाणार आहे. यासाठी मुंबईत शिक्षण विभागाने जोरात तयारी सुरू केली आहे. मुंबईत प्राथमिक शिक्षणाची प्रमुख जबाबदारी ही महापालिका शिक्षण विभागाकडे असून माध्यमिकची शिक्षण उपसंचालक विभागाकडे आहे. या पार्श्वभूमीवर महापालिका आणि अनुदानितच्या २० हजार ३३८ शिक्षकांना ऑनलाईन शिक्षण कसे द्यायचे, यासाठी प्रशिक्षण सुरू करण्यात आले आहे.
मुंबईत २० हजार शिक्षकांना ऑनलाईन शिक्षणाचे ट्रेनिंग - मुंबई शाळा ऑनलाईन शिक्षण बातमी
ऑनलाईन शिक्षण कसे द्यायचे यासाठीचे अनेक धडे शिक्षकांना दिले जात आहेत. सध्या बाजारात स्वस्तात उपलब्ध असलेले झूम ॲप, युटूब, व्हॉट्सअप, टेलिग्रामक आदींचा या ट्रेनिंगसाठी वापर केला जात असल्याची माहिती शिक्षणाधिकारी महेश पालकर यांनी दिली. अनेक शिक्षकांना गुगल क्लासरूमच्या प्राथमिक वापरापासून ते विविध प्रकारचे ॲप कसे वापरावेत, त्यासाठीची शॉर्टकट काय आहेत हे शिकवले जात आहे.
मागील दोन दिवसांपासून हे ट्रेनिंग ऑनलाईन पद्धतीने सुरू असून उद्या शेवटचा दिवस आहे. यात प्रत्येक दिवशी ७ हजारांच्या दरम्यान शिक्षकांना हे ट्रेनिंग दिले जात आहे. यात प्रामुख्याने ऑनलाईन शिक्षण कसे द्यायचे यासाठीचे अनेक धडे शिक्षकांना दिले जात आहेत. सध्या बाजारात स्वस्तात उपलब्ध असलेले झूम ॲप, युटूब, व्हॉट्सअप, टेलिग्रामक आदींचा या ट्रेनिंगसाठी वापर केला जात असल्याची माहिती शिक्षणाधिकारी महेश पालकर यांनी दिली. अनेक शिक्षकांना गुगल क्लासरूमच्या प्राथमिक वापरापासून ते विविध प्रकारचे ॲप कसे वापरावेत, त्यासाठीची शॉर्टकट काय आहेत हे शिकवले जात आहे. तर विद्यार्थ्यांना आपण शिकवत असलेला अभ्यासक्रम सहजपणे कसा समजेल यासाठी शिक्षकांकडूनच काही शैक्षणिक व्हिडिओ तयार करण्यापर्यंतचे ट्रेनिंग दिले जात आहे.
सरकारकडून मागील काही दिवसांमध्ये दिशा अॅपचा मोठा गाजावाजा केला जात आहे. मात्र हे ॲप अजूनही अनेकांना वापरता येत नसल्याने ते वापरण्यासाठी तसेच विविध संकेतस्थळावर उपलब्ध असलेली माहिती कशी संकलित करावी आणि ती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवावी हा विषयही या ट्रेनिंगमध्ये महत्वाचा भाग ठेवण्यात आला आहे. कोरोना आणि त्या पार्श्वभूमीवर ऑनलाईन शिक्षण हे किती गरजेचे आहे, तसेच त्याचे भविष्यातील फायदेही सांगितले जात आहेत. हे शिक्षण देत असताना विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर कोणते परिणाम होतील याचा विचार करण्यासाठी अनेक प्रकारचे मनोरंजनाचे खेळही कसे देता येतील यावरही भर देण्यात आला आहे. तर ज्या ठिकाणी ऑनलाईन शिक्षण देणे शक्य नाही, अशा ठिकाणी ऑफलाईन शिक्षण कसे देता येईल, याचाही विचार या ट्रेनिंगमध्ये केला जात आहे. यासाठी शिक्षकांवर पालकांचे संपर्क क्रमांक, मोबाईल कसे आहेत, याची माहिती गोळा करण्याचे काम सोपवण्यात आले आहे.