महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

बार्ज पी-305 : दुर्घटनेला ओएनजीसी कंपनी जबाबदार; प्रकरणाची चौकशी होणार - मंत्री अस्लम शेख - Barge P 305 accident

बार्ज पी-305 या संपूर्ण प्रकरणाची चौकशी होईल, मग जे जे कंत्राटदार आहेत त्यांच्यावर गुन्हा दाखल करणार असल्याची माहिती मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी दिली आहे.

Minister Aslam Shaikh
मंत्री अस्लम शेख

By

Published : May 21, 2021, 4:47 PM IST

Updated : May 21, 2021, 6:44 PM IST

मुंबई - एवढं मोठे वादळ येणार याची कल्पना दिली असताना, हे सगळं घडले आहे. याला पूर्णपणे ओएनजीसी जबाबदार आहे. यासंदर्भात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ५० मृतदेह आतापर्यंत बाहेर काढण्यात आले आहेत. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी होईल, मग जे जे कंत्राटदार आहेत त्यांच्यावर गुन्हा दाखल करणार असल्याची माहिती मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी दिली आहे.

माहिती देताना मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख

तसेच केंद्राने मृतांच्या नातेवाईकांना मदत केली पाहीजे. चौकशी होणे हे योग्य आहे. मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ओएनजीसी केंद्र सरकारच्या अखत्यारित येते. केंद्र सरकारने संपूर्णपणे कारवाई केली पाहीजे. राज्य सरकारकडून जे प्रयत्न करता आले ते केले, चौकशीनंतर कोणालाही सोडणार नाही, अशी प्रतिक्रिय अस्लम शेख यांनी दिली आहे.

हेही वाचा -पंजाबच्या मोगामध्ये कोसळलं हवाई दलाचं मिग-२१ विमान; जवान हुतात्मा

51 कर्मचाऱ्यांचा मृत्यू

तौक्ते चक्रीवादळात अडकलेल्या 'पी 305 बार्ज'वरील कर्मचाऱ्यांना वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न भारतीय नौदलाकडून सुरू आहेत. आतापर्यंत 220 कर्मचाऱ्यांना सुखरूप वाचवण्यात आले आहे. मात्र, आतापर्यंत 51 कर्मचाऱ्यांचा यामध्ये मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. पी-305 या बार्जवरील कर्मचाऱ्यांच्या बचावकार्यासाठी भारतीय नौदलाच्या बियास, बेतवा आणि तेग या जहाजांनी 'आयएनएस कोची' आणि 'आयएनएस कोलकाता' यांच्यासोबत मिळून बचावकार्यास सुरुवात केली होती. याबरोबरच नौदलाच्या हेलिकॉप्टरचीसुद्धा या बचावकार्यात मदत घेतली. 17 मे रोजी सुरू झालेली ही मोहीम अद्यापही सुरू आहे.

हेही वाचा -ट्रॅक्टर रॅली हिंसाचार प्रकरणी आरोपपत्र दाखल; दीप सिद्धूसह 16 जण आरोपी

Last Updated : May 21, 2021, 6:44 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details