महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

इकबाल मिर्ची प्रकरणात महिला हवाला ऑपरेटरला अटक - mumbai police

वरळी येथील जमीन व्यवहार प्रकरणी ईडीकडून हवाला ऑपरेटर रिंकू देशपांडेला अटक कण्यात आली आहे. ईडीच्या म्हणण्यानुसार रिंकु देशपांडे यांचे इकबाल मिर्चीशी सोबत संबध होते.

इकबाल मिर्ची प्रकरणात हवाला ऑपरेटरला अटक

By

Published : Oct 22, 2019, 10:44 PM IST

मुंबई - वरळी येथील जमीन व्यवहार प्रकरणी ईडी कडून चौथ्या आरोपीला अटक करण्यात आली आहे. ईडी कडून या आगोदर अटक करण्यात आलेल्या रणजित बिंद्रा या आरोपीच्या जबाणीवरून हवाला ऑपरेटर रिंकू देशपांडे या महिला आरोपीला अटक करण्यात आली आहे.

इकबाल मिर्ची प्रकरणात हवाला ऑपरेटरला अटक

मंगळवारी इकबाल मिर्ची याचा खास हस्तक हुमायून मर्चंट याला अटक केल्यानंतर ईडीने रिंकू देशपांडे या महिला आरोपीला अटक केली आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की अटक महिला आरोपी रिंकू देशपांडे व तिच्या कुटुंबियांचे इकबाल मिर्ची सोबत संबंध होते. वरळी येथील जमिनीच्या व्यवहारात रिंकू देशपांडे हिने रणजित बिंद्रा याला 40 कोटी रुपयांची दलाली मिळवून देण्यासाठी मदत केली होती. वरळी येथील व्यवहार करण्यात येणाऱ्या इमारतीत काही बनावट भाडेकरूंना फक्त कागदावर दाखविण्यात आले होते. अटक आरोपी रणजित बिंद्रा याने ईडी चौकशीत कबुली दिली आहे, की 3 जागांच्या व्यवहारासाठी इकबाल मिर्चीला तो लंडनमध्ये भेटला होता. यासाठी सन ब्लिक रियल इस्टेट या कंपनीचा ब्रोकर असल्याचे सांगत तो इकबाल मिर्चीला भेटला होता. रिंकू देशपांडे ही मोठी हवाला ऑपरेटर असल्याचे ईडी चौकशीत रंजित बिंद्रा याने म्हटले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details