मुंबई - बच्चे कंपनीची आवडती राणीबाग कोरोनामुळे गेले ११ महिने बंद होती. कोरोना रुग्णसंख्या कमी होताच राणीबाग म्हणजेच वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालय आजपासून पुन्हा पर्यटकांसाठी सुरू झाली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर, आजपासून सुरू करण्यात आलेल्या उद्यानाला पहिल्या दिवशी १,४१९ पर्यटकांनी भेट दिली. यावेळी बच्चे कंपनीसह मोठ्यांनीही शक्ती, करिश्मा या वाघाच्या जोडीला पाहण्याचा आनंद घेतला. तसेच पेंग्विनच्या पाण्यात सूर मारण्याच्या गंमती -जमतीही अनुभवल्या.
राणीबागेला पहिल्याच दिवशी १ हजार ४१९ पर्यटकांची भेट - वीर जिजाबाई भोसले उद्यान मुंबई
पहिल्या दिवशी प्राणिसंग्रहालयात पर्यटकांची वर्दळ कमी असली तरी या वन्य प्राण्यांना भेटण्याचा आनंद पर्यंटकांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता. उद्यान सुरू झाल्यानंतर पर्यटकांची पावले आपोआपच शक्ती आणि करिश्माच्या पिंजऱ्याकडे वळत होती. राजेशाही थाटातली ही जोडगोळी पाहाण्यासाठी बच्चेकंपनीच्या उड्या पडल्या. त्यानंतर बिबट्याची मादी पिंटो आणि नर ड्रगन तसेच तरस, कोल्हा आणि शेवटी पेंग्विन कक्षाकडे पर्यटक वळत होते.

बच्चे कंपनीच्या उड्या -
मुंबईत गेल्या वर्षी मार्चमध्ये कोरोनाने शिरकाव केल्यानंतर लागलेल्या लॉकडाऊनमुळे वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालय पर्यटकांसाठी बंद करण्यात आले होते. मात्र, सद्यस्थितीत मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात असल्यामुळे उद्यान सुरू करण्यास परवानगी दिली आहे. आज पहिल्या दिवशी प्राणिसंग्रहालयात पर्यटकांची वर्दळ कमी असली तरी या वन्य प्राण्यांना भेटण्याचा आनंद पर्यंटकांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता. उद्यान सुरू झाल्यानंतर पर्यटकांची पावले आपोआपच शक्ती आणि करिश्माच्या पिंजऱ्याकडे वळत होती. राजेशाही थाटातली ही जोडगोळी पाहाण्यासाठी बच्चेकंपनीच्या उड्या पडल्या. त्यानंतर बिबट्याची मादी पिंटो आणि नर ड्रगन तसेच तरस, कोल्हा आणि शेवटी पेंग्विन कक्षाकडे पर्यटक वळत होते.