मुंबई- संचारबंदीची अंमलबजावणी करणारे पोलीस कोरोना संक्रमित होण्याचे प्रमाण वाढत आहे. गेल्या 24 तासात राज्यात 55 कोरोनाग्रस्त पोलीस आढळून आले असून राज्यात 1328 पोलिसांना कोरोनाची बाधा झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. यात तब्बल 136 पोलीस अधिकारी असून 1192 पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. तर राज्यातील 12 पोलीस कर्मचाऱ्यांचा आतापर्यंत दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर मुंबई पोलीस खात्यातील 191 पोलीस कर्मचारी हे कोरोनातून बरे होऊन पुन्हा पोलीस सेवेत रुजू झाले आहेत.
मुंबई पोलीस दलातील 191 कोरोनामुक्त पोलीस पुन्हा सेवेत, राज्यात 1 हजार 328 पोलिसांना कोरोना - लॉकडाऊन
गेल्या 24 तासात राज्यात 55 कोरोनाग्रस्त पोलीस आढळून आले असून राज्यात 1328 पोलिसांना कोरोनाची बाधा झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. यात तब्बल 136 पोलीस अधिकारी असून 1192 पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. तर मुंबई पोलीस खात्यातील 191 पोलीस कर्मचारी हे कोरोनातून बरे होऊन पुन्हा पोलीस सेवेत रुजू झाले आहेत.
राज्यातील विविध ठिकाणी उपचार घेत असलेले 324 पोलीस कोरोनातून बरे झाले असून यात 34 पोलीस अधिकारी व 290 पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. अजूनही 992 पोलिसांवर उपचार सुरू असून यात 101 पोलीस अधिकारी व 891 पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
लॉकडाऊन काळात राज्यात कलम 188 नुसार तब्बल 1 लाख 10 हजार 920 गुन्हे नोंदविण्यात आले असून 676 जणांवर क्वारंटाईन मोडल्याच्या प्रकरणात कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांवर हल्ला होण्याच्या 243 घटना घडल्या असून यात आतापर्यंत पोलिसांनी 822 जणांना अटक केली आहे. कोविड 19च्या संदर्भात पोलिसांच्या 100 क्रमांकाच्या नियंत्रण कक्षावर तब्बल 94,998 कॉल आले असून अवैद्य वाहतुकीच्या 1317 प्रकरणात 59 हजार 709 वाहन जप्त करण्यात आली आहेत. कोविड 19 वर उपचार करणाऱ्या डॉक्टर, नर्स व मेडिकल स्टाफवर 39 ठिकाणी हल्ले झाले असून तब्बल 86 पोलीस कर्मचारी हे जखमी झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.