मुंबई - सुशांतसिंह राजपूत आत्महत्ये प्रकरणी सीबीआय, ईडी व नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून तपास सुरू आहे. या प्रकरणातील ड्रग्ज सिंडिकेट समोर आल्यानंतर आतापर्यंत मुंबईतून 12 तर, गोव्यातून 4 अशा 16 संशयितांना अटक करण्यात आली आहे.
सोमवारी 'नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो'च्या एका पथकातर्फे सूर्यदीप मल्होत्राच्या घरी छापेमारी करण्यात आली होती. सूर्यदीप मल्होत्रा हा ड्रग्ज पेडलर आहे. तो शोविक चक्रवर्तीचा शाळकरी मित्र असल्याचेही एनसीबी तपासात समोर आले आहे. या अगोदर एनसीबीकडून अटक करण्यात आलेला आरोपी जैद विलात्रा याच्या मोबाइल सीडीआरमध्ये सूर्यदीप मल्होत्राशी वारंवार संपर्क केल्याचे स्पष्ट झाले आहे.
सुशांतसिंह आत्महत्या प्रकरण : शोविकचा शाळकरी मित्र 'एनसीबी'च्या ताब्यात - एनसीबी चौकशी
सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरण नवीन वळण घेत असून आता 'नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो'ने रिया चक्रवर्तीचा भाऊ शोविक याच्या शाळकरी मित्राला ताब्यात घेतले आहे. तो ड्रग्ज पेडलर आहे.
(संग्रहित छायाचित्र)
गेल्या दोन दिवसांमध्ये नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून सात आरोपींना अटक करण्यात आली असून यामध्ये करमजीत सिंह, आनंद ऊर्फ केजे, डवैन फर्नांडिस, संकेत पटेल, अंकुश अरनेजा, संदीप गुप्ता आणि आफताब फतेह अन्सारी यांच्यासह ख्रिस कोस्टा यांना ताब्यात घेण्यात आले आहे. अटक केलेल्या आरोपींमध्ये एका रिक्षा चालकाचा देखील समावेश आहे.