महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Face To Face Subhash Desai : नव्या गुंतवणूक करारामुळे 1 लाख रोजगार निर्मिती होणार, उद्योग मंत्री सुभाष देसाई यांचा दावा - गुंतवणूक महाराष्ट्र सुभाष देसाई

दावोस येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय उद्योग परिषदेत ( World Economic Forum meet Subhash Desai) महाराष्ट्राने अतिशय चांगली कामगिरी बजावली असून, यावेळी 80 हजार कोटी ( Subhash Desai on investment in Maharashtra ) रुपयांचे गुंतवणूक करार झाले, तर एक लाख रोजगार निर्मिती होणार असल्याचा दावा राज्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी ईटीव्ही भारत ( Jobs Maharashtra Subhash Desai reaction ) शी बोलताना केला.

One lakh jobs says Industry Minister Subhash Desai
गुंतवणूक महाराष्ट्र सुभाष देसाई

By

Published : Jun 4, 2022, 10:20 AM IST

Updated : Jun 4, 2022, 11:32 AM IST

मुंबई -दावोस येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय उद्योग परिषदेत ( World Economic Forum meet Subhash Desai) महाराष्ट्राने अतिशय चांगली कामगिरी बजावली असून, यावेळी 80 हजार कोटी ( Subhash Desai on investment in Maharashtra ) रुपयांचे गुंतवणूक करार झाले, तर एक लाख रोजगार निर्मिती होणार असल्याचा दावा राज्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी ईटीव्ही भारत ( Jobs Maharashtra Subhash Desai reaction ) शी बोलताना केला.

माहिती देताना उद्योग मंत्री सुभाष देसाई

हेही वाचा -राज्यसभा निवडणुकीत मतदानासाठी अनिल देशमुख आणि नवाब मलिकांचे परवानगी अर्ज दाखल

दावोस येथे झालेली आंतरराष्ट्रीय उद्योग परिषद ही महाराष्ट्रासाठी अत्यंत फलदायी ठरली आहे. या परिषदेत महाराष्ट्राने विविध देशांशी करार केले आहेत. यामध्ये अमेरिका, जपान, साऊथ कोरिया, इंडोनेशिया, सिंगापूर या देशांमधून महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक येणार आहे. ही गुंतवणूक केवळ कागदावरची नाही तर खात्रीशीर आणि प्रत्यक्षात होणारी गुंतवणूक आहे, असा दावा उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना केला.

80 हजार कोटींची गुंतवणूक -या परिषदेत महाराष्ट्राने 23 कंपन्यांसोबत करार केले असून, या कंपन्या महाराष्ट्रात सुमारे 80 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक नजिकच्या काळात करणार आहेत. या गुंतवणुकीमधून विविध क्षेत्रात सुमारे एक लाख रोजगार निर्मिती खात्रीने होईल, असा दावाही देसाई यांनी केला. सौर ऊर्जा क्षेत्रासोबतच खत निर्मिती आणि कीटकनाशके या क्षेत्रात मोठ्या कंपन्या येणार आहेत. सिनर्मास ही कंपनी कागद आणि पाईप क्षेत्रात काम करणार असून, इंडोरिया इंडोनेशियामधील या कंपनीने रायगड येथे याबाबत जमिनीची पाहणी करून कामास सुरुवात करण्याचा निर्णय घेतला आहे, तर यूपीएल ही कंपनी खत निर्मिती आणि पेस्टिसाइडमध्ये काम करणार आहे.

उद्योगांना सवलती देणार -महाराष्ट्रात गुंतवणूक करू इच्छिणाऱ्या या उद्योगांना अन्य राज्यांप्रमाणे महाराष्ट्र विविध सवलती देणार आहे. सध्या स्पर्धेच्या युगात उद्योगांना सवलती देण्याचे धोरण सर्वच राज्यांनी अवलंबले आहे. त्यानुसार महाराष्ट्रही मागे नाही. महाराष्ट्र सरकार या उद्योगांना गुंतवणुकीवरील परतावा देत असते. सात ते वीस वर्षांपर्यंत जीएसटीच्या माध्यमातून हा परतावा दिला जातो. त्याचप्रमाणे उद्योगांसाठी लागणारे पाणी हे मुबलक प्रमाणात पुरवले जाते. एमआयडीसीमध्ये चांगल्या प्रतीची जमीन आणि रस्ते दिले जातात, तसेच मुद्रांक शुल्कात सवलत आणि वीज करात सवलत दिली जाते, असेही देसाई यांनी सांगितले.

नक्षलग्रस्त भागातही उद्योग -विदर्भात विशेषत चंद्रपूर आणि गडचिरोली या नक्षलग्रस्त जिल्ह्यांमध्ये, तसेच यवतमाळ येथेही मोठ्या प्रमाणात उद्योग निर्मिती केली जाणार आहे. नक्षलग्रस्त भागातील लोकांना रोजगार उपलब्ध करून देणे आणि त्यांना मुख्य प्रवाहात आणणे हा उद्देश असल्याचा दावा देसाई यांनी केला. तसेच, नंदुरबार आणि सोलापूर मागास भागात उद्योग निर्मिती करून जनतेला दिलासा देण्याचे काम आघाडी सरकार करत आहे.

मराठी पाट्यांबाबतची अंमलबजावणी होणारच -राज्यात मराठी पाट्यांबाबत राज्य सरकारने कायदा केला असून, त्याची अंमलबजावणी सुरू आहे. याबाबत कोणी काहीही म्हटले तरी अंमलबजावणी थांबणार नाही. काही व्यापाऱ्यांनी पाट्या बदलण्यासाठी वेळ मागितला आहे. व्यावहारिक विचार करून त्याबाबत निर्णय घेतला जाईल, मात्र पाट्या मराठी असाव्यात ही आग्रही भूमिका असून संबंधित महानगरपालिकांनी याबाबतची कार्यवाही करायची आहे. तशा सूचना आणि आदेश महापालिकांना दिले असल्याचेही देसाई यांनी सांगितले.

राज्यसभा बिनविरोध करण्याचा प्रयत्न -राज्यसभेची निवडणूक ही नेहमी बिनविरोध करण्याचा प्रयत्न सर्व राजकीय पक्षांचा असतो. तसाच तो यावेळीही असणार आहे. शिवसेना आपला दुसरा उमेदवार निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे, मात्र ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठीही आम्ही प्रयत्न करत आहोत, असेही देसाई यांनी सांगितले.

हेही वाचा -स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कोरोनावर अवलंबून -वडेट्टीवार

Last Updated : Jun 4, 2022, 11:32 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details