महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

क्वारंटाईनसाठी एक लाख रिकामी घरे उपलब्ध.. - corona in mumbai

म्हाडाकडून ७२५ तर एसआरएकडून अंदाजे १२ हजार घरे मुंबई महानगरातील कोरोनाबाधित तसेच संशयित रुग्णांना क्वारंटाईन करण्यासाठी सज्ज करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.

mumbai MHADA
क्वारंटाईनसाठी एक लाख रिकामी घरे उपलब्ध..

By

Published : Apr 1, 2020, 5:23 PM IST

मुंबई - म्हाडाकडून ७२५ तर एसआरएकडून अंदाजे १२ हजार घरे मुंबई महानगरातील कोरोनाबाधित तसेच संशयित रुग्णांना क्वारंटाईन करण्यासाठी सज्ज करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.

कोरोनाच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहेत. त्याअनुषंगाने या रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांची संख्या वाढत असून त्यांना होम क्वारंटाईन करणे आवश्यक आहे. यासाठी लागणाऱ्या जागेची गरज शहरातील खासगी प्रकल्पासह म्हाडा आणि एसआरएच्या रिकाम्या घरांच्या माध्यमातून पूर्ण केली जाणार आहे. त्यानुसार सरकारकडून तसेच जिल्हाधिकाऱ्यांकडून संबंधित सदनिका ताब्यात घेण्याच्या दृष्टीने प्रक्रिया सुरू आहे. तर क्वारंटाईनसाठी मुंबईत खासगी प्रकल्पातील एक लाखांहून अधिक घरे उपलब्ध होणार असून म्हाडाने ७२४ तर एसआरएने अंदाजे १२ हजार घरे देण्यास समर्थता दर्शवली आहे.

कोरोनाग्रस्तांच्या संपर्कात आलेल्यांना त्वरीत होम क्वारंटाईन करावे लागते. मुंबईतील रुग्णांची आणि संशयितांची वाढती संख्या पाहता क्वारंटाईन करावे लागणाऱ्यांचा आकडा मोठा आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी यावर रिकाम्या घरांचा पर्याय शोधून काढलाय. याआधी केवळ म्हाडा आणि एसआरएच्याच घरांचा पर्याय त्यांच्यासमोर होता. पण आता वाढती संख्या लक्षात घेता शहरातील खासगी गृहप्रकल्पातील रिकामी घरेही घेण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. सरकारच्या या निर्णयानुसार मुंबईत एक लाखांहून अधिक खासगी घरे रिकामी असून त्यांचा वापर करता येऊ शकतो. याबाबत अधिक माहिती बांधकाम क्षेत्रातील तज्ज्ञांनी दिली आहे.

मुंबई महानगर प्रदेशात आजच्या घडीला दोन लाख १० हजार खासगी घरे रिकामी आहेत. तर यातील ६० टक्के म्हणजेच एक लाखांहून अधिक घरे फक्त मुंबईत आहेत. त्यामुळेच संबंधित सदनिका लवकरच क्वारंटाईनसाठी ताब्यात घेतली जाण्याची शक्यता आहे.

जिल्हाधिकाऱ्यांनी 'म्हाडा'कडे चौकशी केली होती. यानुसार म्हाडाने तब्बल ७२५ घरे शोधून काढली असून ती लवकरच क्वारंटाईनसाठी देण्यात येणार असल्याची माहिती म्हाडाच्या मुंबई मंडळाचे मुख्य अधिकारी राधाकृष्णन बी यांनी दिली आहे. मानखुर्द पीएमजी कॉलनी येथे २६५, कांदिवली-चारकोप येथे १७० तर अन्य एका ठिकाणी १९० अशी म्हाडाची ७२५ घरे क्वारंटाईनसाठी असणार आहेत. एसआरएनेही १२ हजार घरे क्वारंटाईनसाठी देऊ केली आहेत. कुर्ला प्रिमियर या ठिकाणी ही घरे असून ती रिकामी आहेत. ही सर्व घरे उपलब्ध झाल्यास प्रशासनाचा जागेचा ताण नक्कीच कमी होणार

ABOUT THE AUTHOR

...view details