Gas Leak At Kurla : कुर्ला इंडस्ट्रीयल इस्टेटमध्ये गॅस लिकेज होऊन एकाचा मृत्यू, दोन जखमी - undefined
घाटकोपर पश्चिम येथील कुर्ला इंडस्ट्रीयल इस्टेट येथे आज सकाळी गॅस लिकेज झाल्याने एकाचा मृत्यू झाला आहे. तर दोन जण जखमी झाले आहेत, त्यांच्यावर राजावाडी रुग्णालयात उपचार सूरु आसल्याची माहिती पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आली आहे.
मुंबई:आज सकाळी 8.15 च्या सुमारास घाटकोपर पश्चिम येथील कुर्ला इंडस्ट्रीयल इस्टेट, नारायण नगर येथे मिथेनॉल व सायनूरिक क्लोराईड (Methanol & Cyanuric chloride gas leakage) गॅस लिकेज झाला. गॅसच्या वासाने श्वसनाचा त्रास झाल्याने 3 जण जखमी झाले. या तिघांना पालिकेच्या राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यापैकी रामनिवास सरोज वय 36 वर्षे याचा रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू झाला. तर रुबिन सोलकर 36 वर्षे व सर्वांश सोनवणे 25 वर्षे यांची प्रकृती ठीक असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आल्याचे आपत्कालीन व्यवस्थापन विभागाकडून सांगण्यात आले आहे.