मुंबई : शंभर कोटी कथित वसुली प्रकरणात ( One Hundred Crore Alleged Recovery ) सचिन वाझेची साक्ष ( Testimony of Sachin Waze ) नोंदवण्याकरिता आज मुंबई सत्र न्यायालयातील ( Mumbai Sessions Court ) विशेष पीएमएलए कोर्टामध्ये ईडीकडून अर्ज दाखल करण्यात आला आहे. न्यायालयाने संबंधित सर्व कागदपत्रे ईडीला दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत. या प्रकरणातसचिन वाझेने माफीचा साक्षीदार ( Sachin Waze will Witness the Apology ) होण्याकरितादेखील कोर्टात अर्ज केलेला आहे.
अनिल देशमुख विरोधात माफीचा साक्षीदार : निलंबित पोलिस अधिकारी सचिन वाझे ( Suspended police officer Sachin Waze ) या प्रकरणात आरोपी क्रमांक एक आहे. या प्रकरणातील इतर आरोपी माजी गृहमंत्री अनिल देशमुख, खासगी सहायक संजीव पालांडे आणि कुंदन शिंदे यांच्याविरोधात माफीच्या साक्षीदार होण्याकरिता अर्ज दाखल केला आहे. या अर्जाला ईडीकडून मंजुरी मिळाली असली तरी अंतिम निर्णय कोर्ट देणार आहे. या अर्जावर मुंबई सत्र न्यायालयातील विशेष PMLA कोर्टात 7 जुलै रोजी सुनावणी होणार असून, अंतिम निर्णय देणार आहे. या पूर्वीदेखील सचिन वाझे यांनी अनिल देशमुख यांच्या विरोधात सीबीआय कोर्टाने माफीचा साक्षीदार म्हणून मंजुरी दिली आहे.
माजी गृहमंत्री अनिल देखमुखांविरोधात गुन्हा : अनिल देशमुख माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह चार जणांविरोधात ईडीने मनी लॉन्ड्रिंग प्रकरणांमध्ये गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये अनिल देशमुख यांचे खासगी सचिव संजीव पालांडे, कुंदन शिंदे आणि निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांचा समावेश आहे. या प्रकरणात अनिल देशमुख यांना ईडीने 2 नोव्हेंबर रोजी अटक केली होती. सध्या या प्रकरणातील सर्व आरोपी न्यायालयीन कोठडीत आहेत.
काय आहे प्रकरण : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना पत्र लिहून माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले होते. अनिल देशमुखांनी सचिन वाझेला प्रत्येक महिन्याला 100 कोटी रुपयांचे वसुलीचे टार्गेट दिलं होते, असा खळबळजनक आरोप परमबीर सिंग यांनी पत्राच्या माध्यमातून केला होता.
सचिन वाझे सध्या पोलीस कोठडीत : यानंतर निलंबित एपीआय सचिन वाझे यांच्यावरही या प्रकरणातील प्रमुख आरोपी म्हणून अटकेची कारवाई करण्यात आली. तसेच देशमुख यांचे खासगी सचिव संजीव पालांडे आणि खासगी सहायक कुंदन शिंदे यांनाही याच प्रकरणात गेल्या दोन महिन्यांपूर्वी अटक करण्यात आली होती. सचिन वाझे सध्या महाराष्ट्र पोलिसांच्या कोठडीत आहेत.
हेही वाचा :Sachin Waze: सचिन वाझे यांचा माफीचा साक्षीदार अर्ज ईडीकडून मंजूर; उद्या कोर्टात होणार निर्णय