मुंबई - दुचाकीचा हॉर्न वाजवल्याच्या क्षुल्लक कारणावरून विद्याविहार येथे एकाची हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. मनोहर चावरीया (वय 57 वर्षे) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.
दुचाकीचा हॉर्न वाजवल्याच्या कारणावरून हाणामारी, एकाचा मृत्यू - टिळकनगर पोलिस
दुपारी 12 च्या सुमारास दिपक चावरिया (वय. 29) त्याचा भाऊ मनोज चावरिया (वय.32) हे भावासोबत कामानिमित्त स्वत:च्या मोटरसायकल वरुन निघाले होते. अरुंद गल्लीतून जाताना रस्त्याच्या मध्ये चाळीतील रहिवाशी संदिप पारचा (वय 28) व त्यांचे वडील पालसिंग पारचा (वय 70) हे उभे होते. दीपक चावरिया यांनी मोटरसायकलचा हॉर्न वाजवला असता आरोपीला याचा राग आला.
विद्याविहार पूर्व रेल्वे स्थानक लगत असलेल्या मोहन नगर बंजारा वस्तीत दुपारी 12 च्या सुमारास दिपक चावरिया (वय. 29) त्याचा भाऊ मनोज चावरिया (वय.32) हे भावासोबत कामानिमित्त स्वत:च्या दुचाकीवरुन निघाले होते. अरुंद गल्लीतून जाताना रस्त्याच्या मध्ये चाळीतील रहिवाशी संदिप पारचा (वय 28) व त्यांचे वडील पालसिंग पारचा (वय 70) हे उभे होते. दीपक चावरिया यांनी मोटरसायकलचा हॉर्न वाजवला असता, आरोपीला याचा राग आला. त्यांने दीपक आणि त्याच्या भावाला शिवीगाळ केली.
या गोष्टीचा जाब विचारला असता, आरोपी आणि त्यांच्या वडिलांनी दीपक व त्यांच्या भावास धक्काबुक्की केली. तक्रारदाराचे वडील मनोहर चावरिया (वय 57) व बहिण पूजा (वय 36) यांनी आरोपींना समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र, संदिप पारचा याने घरातून चाकु आणून दीपक आणि त्याचा भाऊ बहिण आणि वडिलांवर चाकूने वार केले. यामध्ये दीपकचे वडील मनोहर चावरिया यांच्यावर चाकुचे वार झाले. त्यांना जखमी अवस्थेत राजावाडी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. यातील पालसिंग पारचा व कृष्णा पारचा हे सुध्दा जखमी झाले आहेत. याप्रकरणी टिळकनगर पोलिसानी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे .