मुंबई -मालाड मालवणी येथील घर दुसऱ्या घरावर कोसळून १२ जणांचा मृत्यू झाला. ही घटना ताजी असतानाच दहिसर शिवाजी नगर येथे तीन घरे कोसळण्याची घटना समोर आली आहे. या दुर्घटनेत एका २६ वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला आहे. प्रद्युम्न सरोज असे मृताचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार आज सायंकाळी पाऊस सुरू असताना दहिसर लोखंडी चाळ, शिवाजी नगर, शंकर मंदिराजवळील तीन घरे सायंकाळी साडेसहाच्या सुमारास कोसळली. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दल दाखल झाले आहे. त्यांनी शोध मोहीम सुरू केली. या शोध मोहिमेदरम्यान सात ते आठ जणांना बाहेर काढले. तरुणाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात पाठविण्यात आले. मात्र, असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. प्रद्युम्न सरोज असे मृताचे नाव असून तो २६ वर्षाचा आहे.
हेही वाचा-एन ९५ मास्कहून अधिक प्रभावी असलेल्या नॅनॉटेक मास्कची निर्मिती- सिंगापूर विद्यापीठ