मुंबई- कोरोना चाचणीचे बनावट रिपोर्ट देण्याच्या आरोपाखाली मुंबई पोलिसांकडून काळा चौकी परिसरातील स्वामी पॅथॉलॉजी लॅबोरेटरीवर कारवाई करण्यात आलेली आहे. मुंबई पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून सदरच्या ठिकाणी सापळा रचण्यात आला होता. याप्रकरणी पोलिसांनी विद्याधर सहदेव अंबोनकर याच्या विरोधात गुन्हा नोंदविला आहे.
बनावट कोरोना रिपोर्टप्रकरणी एकाला अटक
मुंबई पोलिसांकडून मुंबईतील काळाचौकी पोलीस ठाण्याच्या अंतर्गत असलेल्या स्वामी पॅथॉलॉजी लॅबोरेटरीवर धाड मारण्यात आलेली होती. या ठिकाणी पोलिसांनी कोरोना चाचणी संदर्भात कुठलीही टेस्ट न घेता बनावट कोविड रिपोर्ट देताना विद्याधर सहदेव अंबोनकर या आरोपीला अटक केलेली आहे. या बरोबरच पोलिसांनी एक मोबाईल फोन, एक संगणक, चार हजार रुपये रोख, एक प्रिंटर व 2 बनावट कोरोनाचे रिपोर्ट हस्तगत केले आहेत.
मुंबई पोलिसांकडून मुंबईतील काळाचौकी पोलीस ठाण्याच्या अंतर्गत असलेल्या स्वामी पॅथॉलॉजी लॅबोरेटरीवर धाड मारण्यात आलेली होती. या ठिकाणी पोलिसांनी कोरोना चाचणी संदर्भात कुठलीही टेस्ट न घेता बनावट कोविड रिपोर्ट देताना विद्याधर सहदेव अंबोनकर या आरोपीला अटक केलेली आहे. या बरोबरच पोलिसांनी एक मोबाइल फोन, एक संगणक, चार हजार रुपये रोख, एक प्रिंटर व 2 बनावट कोरोनाचे रिपोर्ट हस्तगत केले आहेत. आर्थिक गुन्हे शाखेच्या कारवाईनंतर सदरचे प्रकरण हे काळाचौकी पोलीस स्टेशनला वर्ग करण्यात आलेले आहे.