मुंबई - राज्यात बर्ड फ्ल्यूमुळे भीतीचे वातावरण आहे. मुंबईत गेल्या २४ तासांत १८२ तर गेल्या ९ दिवसांत १ हजार ६६० कावळे, कबुतरांचा मृत्यू झाल्याच्या तक्रारी महापालिका आपात्कालीन व्यवस्थापन विभागाच्या हेल्पलाईन क्रमांकावर नोंद झाल्या आहेत. मुंबईत बर्ड फ्ल्यूच्या पार्श्वभूमीवर पक्ष्यांच्या मृत्यूच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात येत असल्याने महापालिका यंत्रणा सतर्क झाली आहे.
९ दिवसांत १ हजार ६६० पक्ष्यांचा मृत्यू
राज्यात बर्ड फ्ल्यूच्या तक्रारी आल्यानंतर मुंबई महापालिकेने ५ डिसेंबर पासून पक्षी मृत झाल्याचे निदर्शनास आल्यास १९१६ या हेल्पलाईन क्रमांकावर तक्रार नोंदवण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला मुंबईकरांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. १० जानेवारीच्या सकाळी ७ वाजल्या पासून १९ जानेवारीच्या सकाळी ७ वाजेपर्यंत सात दिवसात १ हजार ६६० कावळे, कबुतर आणि चिमण्या या पक्ष्यांचा मृत्यू झाल्याच्या तक्रारी नोंद झाल्या आहेत. तर रविवार १८ जानेवारीच्या सकाळी ७ ते सोमवार १९ जानेवारीच्या सकाळी ७ वाजेपर्यंत २४ तासात १८२ कावळे, कबुतर आणि चिमण्या या पक्ष्यांचा मृत्यू झाल्याच्या तक्रारी नोंद झाल्या आहेत. मृत पक्ष्यांमध्ये सर्वाधिक मृत्यू हे कावळा आणि कबुतरांचा मृत्यू झाल्याच्या तक्रारी नोंद झाल्या आहेत.
हेही वाचा -नाही, नाही म्हणता कल्याण शहरासह ग्रामीणमध्येही बर्ड फ्ल्यूचा शिरकाव
महापालिका सतर्क
बर्ड फ्ल्यूने महाराष्ट्रात शिरकाव केल्यानंतर राज्य आणि मुंबई महापालिका सतर्क झाले असून प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर भर दिला जात आहे. याचाच एक भाग मृत पक्ष्यांच्या अवशेषांचे शास्त्रीय पध्दतीने विल्हेवाट लावली जात आहे. मुंबईत पोल्ट्रीशी संबंधित मोठे व्यवसाय नाही. त्यामुळे इतर शहरांप्रमाणे मुंबईला बर्ड फ्ल्यूचा धोका नाही. एकाच ठिकाणी मोठ्या प्रमाणात मृत पक्षी आढळले तर अशा पक्ष्यांचे नमुने विशिष्ट टीमकडून गोळा केले जातात. कारण त्यात बर्ड फ्ल्यूचा संशय असतो. त्यांची वेगळया ठिकाणी विशिष्ट पध्दतीने विल्हेवाट लावली जाते. मात्र, संख्या कमी असली तरीही खबरदारी घेतली जात असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
अशी लावली जाते विल्हेवाट