मुंबई: एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची आणि देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्या नंतर काही तासात लगेचच आरे (Aarey Forest Argument) मधील मेट्रो-3 च्या कामाला पुन्हा एकदा गती देण्याचे आदेश दिले. यामुळे पुन्हा एकदा आरे जंगलात वादाचा वणवा पेटला आहे. नविन सरकारच्या या निर्णया विरोधात आज आरे येथील पिकनिक पॉईंट जवळ महाविद्यालयीन विद्यार्थी, पर्यावरण प्रेमी संघटना व राजकीय पक्षांनी एकत्र येत आवाज उठविला आहे. माजी पर्यावरण मंत्री व आमदार आदित्य ठाकरेंनी (Aditya Thackeray joined the agitation in this Aarey) देखील या आरेतील आंदोलनात सहभागी होत मेट्रो कारशेडला विरोध केला आहे.
आम्हाला मुंबईतील ही जैवविवीधता वाचवायची आहे:यासंदर्भात बोलताना आमदार आदित्य ठाकरे म्हणाले की, “या नवीन सरकारला आमच्याबद्दल काही राग किंवा नाराजी असेल तर त्यांनी ती मुंबईकरांवर काढू नये. आरेची लढाई ही मुंबईची लढाई आहे, ती आपल्या देशाच्या, आपल्या जंगलांसाठीची लढाई आहे. आम्ही सरकारमध्ये असताना या आरेतील 808 एकर इतका परिसर जंगल घोषित केला. महानगरातील जैवविविधता वाचवण्यासाठी या प्रकल्पाला विरोध केला जात आहे. मुंबईच्या उत्तर-पश्चिम भागात असलेल्या आरे आणि संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या आसपास बिबट्या वारंवार दिसतो. आरेशी संबंधित विरोध हा केवळ 2,700 हून अधिक झाडे वाचवण्यासाठी नाही. तर हा जैवविविधतेशी संबंधित विषय आहे. आम्हाला मुंबईतील ही जैवविवीधता वाचवायची आहे.” अशी प्रतिक्रिया युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी दिली आहे.
आरे मुंबईचं फुफुस:आरेच्या हे 1,800 एकर वनक्षेत्र 'मुंबईचे फुफुस' म्हणून ओळख जाते. आरेच्या जंगलात बिबट्यांशिवाय जवळपास 300 प्रजातींचे प्राणी आढळतात. हे उपनगर गोरेगाव येथे असून ते संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाला जोडलेले आहे. इथं मुंबईच्या कानाकोपऱ्यातील लोक शनिवार रविवारी स्वच्छ प्रदूषणमुक्त वातावरणाचा आनंद घेण्यासाठी येत असतात. पर्यावरणवादी कार्यकर्त्यांच्या मते, जंगले केवळ शहरातील लोकांना ताजी हवा देत नाहीत. तर वन्यजीवांसाठी एक प्रमुख स्थानिक अधिवास देखील आहेत. या जंगलात सुमारे पाच लाख झाडे असून अनेक नद्या आणि तलाव येथून जातात.