मुंबईआमदार खासदारांनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे CM Eknath Shinde शिवसेनेच्या इतर राज्यातील पदाधिकाऱ्यांकडे मोर्चा वळवत असल्याच्या चर्चा सुरू आहेत. यातच काही दिवसांपूर्वी शिवसेनेच्या पंधरा राज्यांपैकी 12 राज्य प्रमुखांनी एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिल्याच्या बातम्या आल्या होते. मात्र, त्यानंतर हेच सर्व राज्य प्रमुख मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्याच समोर आला. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आता महाराष्ट्रनंतर इतर राज्यातून शिवसेनेत फूट पाडण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चांना उदाहरणाला आहे.
आम्हाला वारंवार आमिष दाखवली जात आहेतया संदर्भात बोलताना पंजाबचे राज्यप्रमुख योगराज शर्मा Punjab State President Yograj Sharma म्हणाले की, त्या ज्या काही बातम्या आल्या त्या पूर्णपणे थोतांड आणि चुकीच्या आहेत. सर्व राज्य प्रमुख त्यांची काम घेऊन मुख्यमंत्र्यांना भेटायला गेले होते. सर्वांनी एकत्र त्यांचा वेळ मागितला होता. मात्र, कोणीही त्यांना समर्थन दिलेलं नाही. ही गोष्ट सत्य आहे की शिंदे गटाकडून आम्हाला वारंवार त्यांच्याकडे येण्यासाठी संपर्क होत आहे. मात्र, आम्ही शिवसेनेचे एकनिष्ठ शिवसैनिक आहोत. आम्ही अशा आमिषांना बळी पडणार नाही. त्यांनी जे काही फोटो व्हायरल केले ते चुकीचे आहेत. त्यांचे पितळ आता उघड पडलेल आहे. आम्ही अजून देखील शिवसेनेतच आहोत.