महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Diwali 2021 : धनत्रयोदशीला 'या' वेळेस करा धनाची पूजा - दिवाळी 2021

भगवान धनवंतरी हे विष्णूचे रूप मानले जाते. भगवान धनवंतरी हे वैद्यकीय शास्त्राचे प्रमुख देवता आहेत. तसेच दिवाळीची सुरुवात याच दिवसापासून होत असल्याने हा दिवस धुमधडाक्यात साजरा करतात. या दिवशी दागिने आणि भांड्यांची खरेदी केली जाते.

Dhanteras
Dhanteras

By

Published : Nov 2, 2021, 6:01 AM IST

हैदराबाद -दिवाळी हा देशातील सर्वात मोठ्या सणांपैकी एक आहे. हा सण देशात पाच दिवस साजरा केला. यंदा 2 नोव्हेंबरपासून म्हणजे धनत्रयोदशीपासून दिवाळीला सुरूवात होत आहे. हा दिवस भगवान धनवंतरींचा जन्मदिवस म्हणून साजरा करतात. या दिवशी पिवळ्या धातूंची खरेदीसुद्धा केली जाते.

धनत्रयोदशीला 'या' वेळेस करा धनाची पूजा

भगवान धनवंतरी हे विष्णूचे रूप मानले जाते. भगवान धनवंतरी हे वैद्यकीय शास्त्राचे प्रमुख देवता आहेत. तसेच दिवाळीची सुरुवात याच दिवसापासून होते. त्यामुळे हा दिवस धुमधडाक्यात साजरा करतात. या दिवशी दागिने आणि भांड्यांची खरेदी केली जाते. धनत्रयोदशीच्या दिवशी भगवान धनवंतरी आणि देवी लक्ष्मीच्या पूजेसोबतच देवतांचे खजिनदार कुबेर यांचीही पूजा केली जाते.

धनत्रयोदशीच्या महत्त्वाच्या वेळा आणि मुहूर्त -

मंगळवार, 02 नोव्हेंबर 2021

सूर्योदय - सकाळी 06:33

सूर्यास्त - संध्याकाळी 05:47

अभिजित मुहूर्त - सकाळी 11:50 ते 12:33 पर्यंत

विजय मुहूर्त - 02:03 PM ते 02:47 PM

राहू काल - दुपारी 02:59 ते दुपारी 04:23 पर्यंत

योग - वैधता संध्याकाळी 06:13 पर्यंत, विस्कंभ

पूजेचा शुभ काळ -

पहिला मुहूर्त प्रदोष काल - संध्याकाळी 05:50 ते रात्री 08:21

दुसरा मुहूर्त वृषभ राशी - संध्याकाळी 06:32 ते रात्री 08:30

हेही वाचा -दिवाळी खरेदीसाठी नाशिकच्या रस्त्यांवर तुडूंब गर्दी.. कोरोनाची तिसरी लाट तर आणणार नाही ना ?

ABOUT THE AUTHOR

...view details