मुंबई -शहरात गेल्या वर्षीच्या मार्च पासून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव आहे. महापालिका व आरोग्य विभागाच्या प्रयत्नामुळे रुग्णसंख्या कमी होत होती. मात्र, फेब्रुवारीपासून पुन्हा रुग्णसंख्या वाढू लागली आहे. मुंबईत गेल्या काही दिवसात 7 ते 11 हजाराच्यावर रुग्ण आढळून येत आहेत. गेले काही दिवस रूग्ण संख्येत चढ उतार पाहायला मिळत आहे. चौथ्या दिवशी रुग्णसंख्या 7 हजाराच्या घरात आढली होती. आज 7410 नवे रुग्ण आढळले असून 75 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मुंबईत रुग्णसंख्या स्थिर असली तरी मृतांच्या आकड्यात मात्र वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे.
8 हजार 90 रुग्णांना डिस्चार्ज -
मुंबईत आज 7 हजार 410 रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे कोरोनाग्रस्तांचा आकडा 6 लाख 9 हजार वर पोहचला आहे. आज 75 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृतांचा आकडा 12 हजार 576 वर पोहचला आहे. 8 हजार 90 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याने रुग्ण बरे होण्याची संख्या 5 लाख 11 हजार 143 वर पोहचली आहे. मुंबईत सध्या 83 हजार 953 सक्रिय रुग्ण आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 84 टक्के असून रुग्ण दुप्पटीचा कालावधी 50 दिवस इतका आहे. मुंबईत कोरोना रुग्ण आढळून आलेल्या 114 चाळी आणि झोपडपट्ट्या कंटेंनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आल्या आहेत. 1 हजार 198 इमारती रुग्ण आढळून आल्याने सील करण्यात आल्या आहेत. कोरोना रुग्णांचा शोध घेण्यासाठी आतापर्यंत 51 लाख 22 हजार 026 चाचण्या करण्यात आल्या आहेत, अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.
हे विभाग हॉटस्पॉट -