मुंबई -अनेक वर्षानंतर आज भारत आणि पाकिस्तान यांच्यात क्रिकेट सामना रंगणार आहे. आयसीसीच्या स्पर्धा वगळता भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये सामना होत नाही. विश्वचषकाच्या निमित्ताने भारत आणि पाकिस्तान संघ आज आमने सामने उतरणार आहे. व्यावसायिकांनीही या सामन्याच्या निमित्ताने वेगवेगळे ऑफर द्यायला सुरुवात केली आहे. चेंबूर येथील एका ज्यूस विक्रेत्यांनी एक ज्यूसवर एक जूस मोफत अशी ऑफर ठेवली आहे.
India pak Match : भारत-पाक सामन्याच्या निमित्ताने ज्यूसच्या खरेदीवर एक ज्यूस फ्री - ाून वपोीोू तगना
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील T 20 विश्वकप स्पर्धेनिमित्त चेंबूरच्या ज्यूसमंत्र या व्यावसायिकाने 1 ज्यूसवर 1 मोफत जूस ठेवला आहे. क्रिकेट प्रेमी असलेले बबलू सिंह यांना लहानपणापासून क्रिकेटची आवड आहे. या सामन्यातून स्वतः आनंद घेऊन दुसऱ्यांना आनंद द्यायचा म्हणून ही सवलत दिल्याचे बबलू सिंह यांनी सांगितले.
India pak Match