महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Omicron Variant : ओमायक्रॉनला रोखण्यासाठी मुंबई पालिकेचा अॅक्शन प्लान, पॉझिटीव्ह रुग्णांच्या होणार जीनोम सिक्वेन्सिंग चाचण्या - Mumbai Corporation's Action Plan Prevent Omicron

मुंबईमध्ये कोरोना विषाणूचा प्रसार कमी होत असताना नवीन व्हेरियंट (Omicron Corona new Variant) असलेल्या ओमायक्रॉन विषाणूचे रुग्ण आढळून येत आहेत. मुंबईमध्ये ओमायक्रॉनचा प्रसार रोखता यावा यासाठी पालिकेचा आरोग्य विभाग कामाला  लागला आहे. ओमायक्रॉन रुग्णांच्या संपर्कात आलेल्या सर्व कोरोना पॉजिटीव्ह रुग्णांची जीनोम सिक्वेन्सिंग (Genome sequencing tests) चाचणी केली जाणार आहे.

Omicron Variant
Omicron Variant

By

Published : Dec 15, 2021, 6:43 PM IST

मुंबई - मुंबईमध्ये कोरोना विषाणूचा प्रसार कमी होत असताना नवीन व्हेरियंट (Omicron Corona new Variant) असलेल्या ओमायक्रॉन विषाणूचे रुग्ण आढळून येत आहेत. मुंबईमध्ये ओमायक्रॉनचा प्रसार रोखता यावा यासाठी पालिकेचा आरोग्य विभाग कामाला लागला आहे. ओमायक्रॉन रुग्णांच्या संपर्कात आलेल्या सर्व कोरोना पॉजिटीव्ह रुग्णांची जीनोम सिक्वेन्सिंग चाचणी (Genome sequencing tests) केली जाणार आहे. यामुळे रुग्णांवर वेळीच उपचार करणे शक्य होणार आहे अशी माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.

ओमायक्रॉनचा प्रसार रोखण्यासाठी अॅक्शन प्लान -

मुंबईमध्ये ओमायक्रॉनचे (Omicron Corona new Variant) ५ रुग्ण आढळून आले होते. त्यात डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला परदेशातून आलेला प्रवासी व त्याच्या संपर्कात आलेले सात जण असे एकूण ८ जण ओमायक्रॉन पॉझिटीव्ह आले होते. मंगळवारी यापैकी एकावर रुग्णालयात उपचार सुरु होते. तर इतर होम क्वारंटाईन होते. या सर्वांच्या चाचण्या केल्या असता सर्व ८ जण निगेटिव्ह आले आहेत. ओमायक्रॉन विषाणूची बाधा झाली आहे, अशा रुग्णाच्या संपर्कात येणाऱ्या लोकांनाही त्याचा संसर्ग होत असल्याचे समोर आले आहे. यामुळे जे रुग्ण ओमायक्रॉन पॉझिटीव्ह येतील त्यांच्या संपर्कात आलेले जे कोणी रुग्ण कोरोना पॉझिटीव्ह येतील त्यांची जीनोम सिक्वेन्सिंग चाचणी (Genome sequencing tests) केली जाणार आहे. तसेच जे निगेटिव्ह आले असतील त्यांच्याही सात दिवसांनी चाचण्या केल्या जाणार आहेत. यामुळे वेळीच रुग्ण समोर येऊन त्यांच्यावर त्वरित उपचार करून ओमायक्रॉनचा प्रसार रोखता येणार असल्याची माहिती काकाणी यांनी दिली.

एकाच कंपनीत काम करणारे पॉझिटीव्ह -

डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात विदेश प्रवास केलेल्या एका नागरिकाला कोरोना सदृश्य लक्षणे दिसू लागल्यानंतर त्याची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली. त्यात त्याला कोरोनाचा संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले. त्या रुग्णाने विदेश प्रवास केल्याची माहिती सांगितल्यानंतर तातडीने त्याच्या समवेत मुंबईत एकाच ठिकाणी कार्यरत असलेल्या निकटच्या संपर्कातील सात जणांचीही कोविड चाचणी करण्यात आली. त्यात त्यांनाही कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले. मात्र ते एसिम्प्टोमॅटिक आढळले आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून या सर्व आठही जणांचे नमुने राष्ट्रीय विषाणूविज्ञान संस्था (एनआयव्ही, पुणे) ( National Institute of Virology, Pune ) येथे जीनोम सिक्वेंसिंग चाचणीसाठी पाठविण्यात आले. त्यात या सर्वांना ओमायक्रॉन कोविड विषाणू प्रकाराची बाधा झाल्याचा अहवाल महानगरपालिका प्रशासनाला प्राप्त झाला आहे. या आठपैकी फक्त एकच जण रुग्णालयात दाखल आहे. तर, या आठ पैकी एक जण मुंबई बाहेरील रहिवासी आहे. या सर्वांच्या सात दिवसांनी कोरोना चाचण्या केल्या असता त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. दरम्यान या आठ जणांच्या संपर्कात आलेल्या साठ जणांच्या कोरोना चाचण्या केल्या असता त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे, अशी माहिती काकाणी यांनी दिली.

रुग्णांचा आकडा १३ वर -

मुंबईत याआधी ओमायक्रॉनचे ५ रुग्ण आढळून आले होते. आता डिसेंबर महिन्यात परदेश प्रवास केलेला १ व त्याच्या संपर्कात आलेले ७ असे एकूण ८ जण ओमायक्रॉन पॉझिटीव्ह आढळून आले आहेत. यामुळे मुंबईमधील ओमायक्रॉन रुग्णांचा आकडा १३ वर गेला आहे. याआधी मुंबईमधील ३ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला होता. यात आता आणखी ७ जणांचा अहवाल निगेटिव्ह आल्याने आतापर्यंत १० जणांनी ओमायक्रॉनवर मात केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details