महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Omicron Variant : नव्या व्हॅरिएंटच्या पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळ बैठकीत महत्वाचे निर्णय - राज्य मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक

कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हॅरिएंटचा(Omicron Variant) प्रसार अनेक देशांत होत असून या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने तातडीची मंत्रिमंडळ बैठक(Cabinet Meeting) बोलावली होती. या बैठकीत परदेशी पर्यटकांविषयी काही निर्णय घेण्यात आले. ख्रिसमस पार्टीसाठी नवे नियम तसेच शाळा सुरू करण्याच्या निर्णयावरही बैठकीत चर्चा झाली.

mantralay
mantralay

By

Published : Nov 29, 2021, 9:38 AM IST

Updated : Nov 29, 2021, 1:35 PM IST

मुंबई : कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हॅरिएंटचा(Omicron Variant) प्रसार अनेक देशांत होत असून या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने तातडीची मंत्रिमंडळ बैठक(Cabinet Meeting) बोलावली होती. या बैठकीत परदेशी पर्यटकांविषयी काही निर्णय घेण्यात आले. ख्रिसमस पार्टीसाठी नवे नियम तसेच शाळा सुरू करण्याच्या निर्णयावरही बैठकीत चर्चा झाली. चाईल्ड टास्क फोर्सशी याविषयी चर्चा केली जाणार आहे.

कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हॅरिएंटचा(Omicron Variant) प्रसार अनेक देशांत होत असून या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने तातडीची मंत्रिमंडळ बैठक(Cabinet Meeting) बोलावली होती. राज्य विधिमंडळाचे अधिवेशन, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, येत्या १ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या सरसकट शाळा, कोविडच्या पार्श्वभूमीवर राज्यातील आरोग्य सेवा-सुविधांवर या बैठकीत चर्चा झाली. सकाळी १० वाजता मंत्रालयात झालेलया या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे बैठकीला उपस्थित राहिले.


कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा संसर्ग आटोक्यात येत असतानाच विदेशात कोरोनाच्या नव्या व्हॅरिएंटने थैमान घातले आहे. सर्वाधिक वेगाने पसरणाऱ्या या विषाणुळे जगभरात पुन्हा आरोग्य आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी तातडीची बैठक बोलावून आरोग्य यंत्रणेला सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या. नागरिकांनीही बेफिकीर न राहता, कोरोनाच्या त्रिसूत्री नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेत, राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन मुंबईत होणार आहे. तर दुसरीकडे विधान परिषदेच्या रिक्त जागांच्या निवडणूका होत आहेत. शिवाय, एक डिसेंबरपासून राज्यातील सरसकट शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांचा सेवा विस्तार आणि एसटी संप यावरही या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आज होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीकडे लक्ष लागून आहे.

Last Updated : Nov 29, 2021, 1:35 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details