महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Omicron Threat Mumbai : दुबईतून येणारे प्रवासी आता ७ दिवस होम क्वारंटाईन.. सार्वजनिक वाहतूक वापरण्यास बंदी - Mumbai Omicron Cases

मुंबईमध्ये कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हॅरिएंटचे रुग्ण वाढण्याची भीती ( Omicron Threat Mumbai ) आहे. दुबईहून मुंबईला येणाऱ्या अनेक प्रवाश्यामध्ये कोरोनाचा ओमायक्रॉन व्हॅरिएंट ( Omicron In Dubai Return Passengers ) आढळून येत असल्याने मुंबई महानगरपालिका ( Mumbai Municipal Corporation ) सतर्क झाली आहे. त्यामुळेच दुबईतून मुंबईला येणाऱ्या सर्व प्रवाशांना ७ दिवस होम क्वारंटाईन ( Home Quarantine For Dubai Passengers ) करण्यात येणार आहे. यासह या प्रवाशांना सार्वजनिक वाहतुकीचा वापर करण्यासही मनाई करण्यात आली आहे.

दुबईतून येणारे प्रवासी आता ७ दिवस होम क्वारंटाईन
दुबईतून येणारे प्रवासी आता ७ दिवस होम क्वारंटाईन

By

Published : Dec 24, 2021, 8:22 PM IST

मुंबई - मुंबईमध्ये कोरोनाचा प्रसार वाढत आहे. त्यातच कोरोनाचा नवीन व्हेरियंट ओमायक्रॉन विषाणूचाही प्रसार वाढत ( Omicron Threat Mumbai ) आहे. या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी दुबईहून येणाऱ्या प्रवाशांसाठी विशेष मार्गदर्शक सूचना ( BMC Guidelines For Dubai Passengers ) जारी केल्या आहेत. दुबई येथून येणाऱ्या प्रवाशांना सक्तीने ७ दिवस होम क्वारंटाईन ( Home Quarantine For Dubai Passengers ) केले जाणार आहे. तसेच या प्रवाशांना सार्वजनिक वाहतूक वापरण्यास बंदी घातली आहे.

नियम झुगारून दुबईमार्गे शहरात

मुंबईमध्ये गेले पावणे दोन वर्षे कोरोनाचा प्रसार होत आहे. जगभरात कोरोनाचा नवीन व्हेरियंट असलेल्या ओमायक्रॉनचा प्रसार वाढला आहे. देशातही ओमायक्रॉनचे रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे तिसरी लाट येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. दक्षिण आफ्रिकेसह इतर देशांतून येणारे नागरिक नियम झुगारून दुबईमार्गे शहरात येत असल्याचे समोर आले आहे.

७ दिवस होम क्वारंटाईन

या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाने दुबईहून येणाऱ्या प्रवाशांसाठी विशेष गाईड लाईन प्रसिद्ध केली आहे. ज्या अंतर्गत आता दुबईमधून येणाऱ्या प्रवाशांना विमानतळावर आरटीपीसीआर चाचणी ( RTPCR At Airport ) न करता थेट होम क्वारंटाईन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. याचबरोबर दुबई येथून येणाऱ्या प्रवाशांना सार्वजनिक वाहतूक वापरण्यास मनाई करण्यात आली आहे. मुंबई विमानतळावर येणारे प्रवाशी हे मुंबई बाहेरचे असतील, तर इच्छितस्थळी जाण्यासाठी विशेष गाड्यांची व्यवस्था करून त्यांना सोडण्याची व्यवस्था जिल्हाधिकाऱ्यांनी करावी. तसेच मुंबईहून कनेक्टिंग फ्लाइट वापरणाऱ्या प्रवाशांना कनेक्टिंग फ्लाइटवर सोडण्याची जबाबदारी एअरपोर्ट विभागावर सोपवण्यात आली आहे.

सात दिवसांनी प्रवाशांच्या चाचण्या

दुबई येथून येणाऱ्या प्रवाशांना ७ दिवस होम क्वारंटाईन राहणे बंधनकारक असणार आहे. सात दिवसानंतर या प्रवाशांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात येणार आहे. या कालावधीत प्रवाशाला ७ दिवस स्वत:च्या आरोग्यही काळजी घ्यावी लागणार आहे. आरटीपीसीआर चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यास त्या प्रवाशाला संस्थात्मक कोरोना सेंटरमध्ये ( Institutional Quarantine Centre ) ठेवले जाणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details