मुंबई: दक्षिण आफ्रिकेसह काही देशात कोरोना विषाणूचा ओमायक्रॉन (Omicron of corona virus) हा व्हेरियंट समोर आला. त्याचा प्रसार झपाट्याने होत असल्याने केंद्र सरकारने देशात येणाऱ्या परदेशी प्रवाशांच्या चाचण्या करण्याच्या तसेच त्यांना क्वारंटाइन करण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने
(Mumbai Municipal Corporation) मुंबई विमानतळावर (Mumbai Airport) नोव्हेंबरपासून आलेल्या आलेल्या परदेशी प्रवाशांचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. पालिकेच्या विभागवार असलेल्या वॉर रूममधून (War Room) या प्रवाशांचा शोध घेतला जात आहे. या प्रवाशांच्या आरटीपीसीआर चाचण्या केल्या जात आहेत.
Omicron - धारावीवर ओमायक्रॉनचे सावट, 2794 पैकी 13 परदेशी प्रवासी पाॅझीटिव्ह - परदेशी प्रवासी
कोरोनाचा ओमायक्रॉन (Omicron of corona virus) या नवीन व्हेरियंटच्या प्रसाराच्या पार्श्वभूमीवर मुंबई विमानतळावर (Mumbai Airport) आलेल्या प्रवाशांना शोधून त्यांच्या चाचण्या केल्या जात आहेत. आतापर्यंत 2794 परदेशी प्रवाशांच्या (Foreign travelers) चाचण्या झाल्या असून त्यापैकी 13 जन पाॅझीटिव्ह आहेत. डोंबिवलीत एकाला लागण झाल्याचे समोर आले. त्यानंतर टांझानिया येथून धारावीत आलेला प्रवासी पाॅझीटिव्ह आला आहे. त्यामुळे धारावीवर ओमायक्रॉन Omicron Panic on Dharaviसावट आहे.
हाय रिस्क देशातून आले 3760 प्रवासी
10 नोव्हेंबर ते 3 डिसेंबर दरम्यान हाय रिस्क (High risk country) देशातून 3760 प्रवासी मुंबईमध्ये आले आहेत. या सर्वांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. त्यापैकी 2794 प्रवाशांचा शोध घेऊन त्यांच्या चाचण्या करण्यात आल्या. त्यापैकी 13 प्रवासी कोरोना पाॅझीटिव्ह सापडले आहेत. यात 12 पुरुष तर 1 महिला प्रवासी आहे. या पाॅझीटिव्ह प्रवाशांच्या संपर्कात आलेल्या लोकांचा शोध घेतला जात आहे. या सर्व पोजिटिव्ह प्रवासी रुग्णांना रुग्णालयात भरती करण्यात आले असून त्यांचे नमुने जिनोम सिक्वेनसिंग तसेच एस जिन चाचणीसाठी पाठवण्यात आल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाच्या मुख्य कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी दिली आहे.
धारावीवर ओमायक्रॉनचे सावट
राज्यातील ओमायक्रॉनचा पहिला रुग्ण डोंबिवली येथे आढळूला. त्यातच धारावी येथे पूर्व अफ्रिकेतील टांझानिया येथून आलेला एक प्रवासी कोरोना पाॅझीटिव्ह आला आहे. या व्यक्तीला सेव्हन हिल रुग्णालयात दाखल केले आहे. या व्यक्तीच्या कुटूंबियांच्या चाचण्या करण्यात आल्या असून त्याचे अहवाल उद्या येणार आहेत. दरम्यान या व्यक्तीचे स्वॅब जिनोम सिक्वेंसिंगकरता कस्तुरबा रुग्णालयातील प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. याच्या अहवालाची प्रतीक्षा केली जात आहे. धारावी याआधीही कोरोनाची हॉटस्पॉट बनली होती. आता धारावीमध्येही ओमायक्रॉन सावट असल्याची चिंता व्यक्त करण्यात येत आहे.
हेही वाचा :Omicron May Bring Third Wave : भारतात तिसऱ्या लाटेची शक्यता, सरकारचे खबरदारी घेण्याचे आवाहन