महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Omicron Cases in Mumbai : मुंबईत ओमायक्रॉनचे २७ नवे रुग्ण, रुग्णांचा आकडा ३१७ वर - ओमायक्रॉन केसेस इन मुंबई

मुंबईत परदेश प्रवास केलेल्या २७ प्रवाशांना ओमायक्रॉनचा संसर्ग (Omicron Cases in Mumbai) झाला आहे. यामुळे मुंबईमधील ओमायक्रॉन रुग्णांची संख्या ३१७ झाली आहे. त्यापैकी १५१ रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.

corona
कोरोना फाईल फोटो

By

Published : Jan 3, 2022, 11:37 PM IST

मुंबई -मुंबईत एकीकडे कोरोना (Corona) विषाणूचा प्रसार वाढत असताना नवीन व्हेरियंट असलेल्या ओमायक्रॉनचे रुग्ण आढळून (Omicron Cases) येत आहेत. मुंबईत परदेश प्रवास केलेल्या २७ प्रवाशांना ओमायक्रॉनचा संसर्ग (Omicron Cases in Mumbai) झाला आहे. यामुळे मुंबईमधील ओमायक्रॉन रुग्णांची संख्या ३१७ झाली आहे. त्यापैकी १५१ रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.

रुग्णांचा आकडा ३१७ वर -

मुंबई विमानतळावर अति जोखमीच्या देशातून १४,६३८ प्रवासी आले. त्यामधील ११४ प्रवासी विमानतळावरच्या चाचणीत कोरोना पॉजिटिव्ह आढळून आले आहेत. १ नोव्हेंबर पासून परदेश प्रवास केलेल्या प्रवाशांचे सर्वेक्षण केले जात आहे. त्यात २३८ प्रवासी कोरोना पॉजिटिव्ह आढळून आले आहेत. कोरोना बाधितांच्या अतिजोखमीच्या सहवासातील ३६ रुग्ण पॉजिटिव्ह आढळून आले आहेत. कोरोना पॉजिटीव्ह प्रवाशांचे नमुने राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था (एनआयव्ही, पुणे) येथे जीनोम सिक्वेंसिंग चाचणीसाठी पाठविण्यात आले. त्यात आतापर्यंत परदेश प्रवास केलेले १५७ (९४ पुरुष, ६३ स्त्री) तसेच १६० ( १०५ पुरुष, ५५ स्त्री) अशा एकूण ३१७ जणांना ओमायक्रॉन कोविड विषाणू प्रकाराची बाधा झाल्याचा अहवाल महानगरपालिका प्रशासनाला प्राप्त झाला आहे. एकूण ३१७ पैकी ८४ रुग्ण मुंबईबाहेरील आहेत.

नागरिकांनी भीती बाळगू नये -

विषाणूमध्ये बदल होणे ही नैसर्गिक प्रक्रिया असून या बाबत नागरिकांनी भीती न बाळगता आपल्या नेहमीच्या व्यवहारात मास्क घालणे, वारंवार हात धुणे, सुरक्षित अंतर पाळणे, गर्दीत न जाणे या कोविड नियमांचे पालन करावे. नागरिकांनी आपले लसीकरण पूर्ण करावे आणि मागील महिनाभरात जे प्रवासी आंतरराष्ट्रीय प्रवास करून भारतात आले आहेत, त्यांनी त्याची माहिती स्थानिक आरोग्य विभागास द्यावी, असे आवाहन पालिकेने नागरिकांना केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details