मुंबई:कोरोनाच्या ओमीक्रोन (Omicron) या व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर मुंबईत येणाऱ्या प्रवाशांची विमानतळावरच तपासणी केली जात आहे. मुंबई विमानतळावर 10 नोव्हेंबरपासून आलेल्या प्रवाशांचा शोध घेऊन आरटीपीसीआर चाचण्या केल्या जात आहेत. जे रुग्ण कोरोना पोजिटिव्ह आढळून येत आहेत त्यांची जिनोम सिक्वेनसिंग व एस जिन या चाचण्या केल्या जात आहेत. या खबरदारी नंतरही ओमायक्रोन किंवा कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण मुंबईत येऊ नये यासाठी पालिकेने मार्गदर्शक सुचनांमध्ये बदल केले आहेत.
BMC New Guidelines On Omicron : ओमायक्राॅनची नाकेबंदी, परदेशी प्रवाशांना 7 दिवस सक्तीचे क्वारंटाइन - Municipal Ward War Room
कोरोनाचे रुग्ण पुन्हा वाढू लागले आहेत. त्यातच ओमायक्राॅन (Omicron) हा नवा विषाणू समोर आला आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेने ओमायक्राॅनची नाकेबंदी करण्याचा निर्णय घेतला असून मुंबईत येणाऱ्या परदेशी प्रवाशांना ( foreign travelers) 7 दिवस होम क्वारंटाइन (7 days compulsory quarantine) राहण्याची सक्ती केली जाणार आहे. तसेच जे प्रवासी होम क्वारंटाइन आहेत त्यांच्या आरोग्याची विचारपूस पालिकेच्या वॉर्ड वॉर रूम द्वारे तसेच मेडिकल टीम घरी पाठवूनही तपासणी (Inspection by Municipal Ward War Room) केली जाणार आहे.
पालिकेने मार्गदर्शक सुचनांमध्ये केलेल्या बदलानुसार मुंबई विमानतळावर आलेल्या सर्व प्रवाशांना 7 दिवस सक्तीचे होम क्वारंटाइन (7 days compulsory quarantine) असेल. मुंबई विमानतळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवाशांची यादी रोज सकाळी 9 वाजता पालिकेच्या आप्तकालीन व्यवस्थापन विभागाला देतील. ही यादी प्रवाशांच्या निवासी पत्त्यानुसार पालिकेच्या 24 विभाग कार्यालयांना पाठवली जाईल. या विभाग कार्यालयात असलेल्या वॉर रूमच्या माध्यमातून (Inspection by Municipal Ward War Room) होम क्वारेटाईन प्रवाशांची रोज पाच वेळा आरोग्याबाबत विचारणा केली जाईल. आरोग्य विभागाची टीम रोज क्वारंटाइन प्रवाशांच्या घरी जाऊन आरोग्याची तसेच नियमांचे पालन करतात का याची तपासणी करेल. सातव्या दिवशी प्रवाशाची आरटीपीसीआर चाचणी केली जाईल.