महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Ola Driver arrested : मुंबईत ओला टॅक्सी ड्रायव्हरला अटक; अल्पवयीन मुलीचा केला विनयभंग - आरे पोलीस स्टेशन मुंबई

मुंबईतील आरे कॉलनीत ( Aarey Colony in Mumbai ) राहणारी 15 वर्षीय अल्पवयीन मुलगी 25 मे रोजी भोपाळवरून विलेपार्ले टर्मिनल 2 वरून ओला टॅक्सी बुक करून घरी जात असताना टॅक्सी ड्रायव्हरने ( OLA taxi driver ) अल्पवयीन मुलीचा अश्लील चाळे आणि छेडछाड करीत विनयभंग ( Molestation of a Minor Girl ) केला. त्याप्रकरणी गुन्हा दाखल केल्यानंतर त्याला अटक करण्यात आली आहे.

Ola Driver arrested
ओला ड्रायव्हरला अटक

By

Published : May 28, 2022, 3:37 PM IST

मुंबई : मुंबईतील आरे कॉलनीत ( Mumbai Aarey Colony ) राहणारी 15 वर्षीय अल्पवयीन मुलगी 25 मे रोजी भोपाळवरून विलेपार्ले टर्मिनल 2 वरून ओला टॅक्सी बुक करून घरी जात असताना टॅक्सी ड्रायव्हरने अल्पवयीन मुलीला अश्लील चाळे आणि छेडछाड करीत विनयभंग ( Arrested for pornography and molestation ) केला. या आरोपात ओला टॅक्सी ड्रायव्हर मुरारी कुमार सिंह (वय 29, आरे) याला पोलिसांकडून 27 मे रोजी अटक करण्यात आली आहे. आरोपीला दिंडोशी सत्र न्यायालयात कोर्टासमोर हजर केले असता त्याला 30 मे पर्यंत पोलिस कोठडीत पाठवण्याचा निर्णय न्यायालयाने दिला आहे.

मुलीच्या एकटेपणाचा फायदा घेत चाळे : पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार 15 वर्षीय अल्पवयीन मुलगी भोपाळवरून विलेपार्ले येथे आली असता, त्या मुलीने आरे कॉलनीतील तिच्या घरी जाण्याकरिता ओला टॅक्सी बुक केली. ओला टॅक्सीत बसल्यानंतर टॅक्सी ड्रायव्हरने तिला म्हटले की, तुला जर मित्र नसेल तर मी तुझा मित्र बनू का, मुलीने कुठलेही उत्तर न दिल्याने ड्रायव्हरने चालू गाडीत गाडीमधील आरश्यामधून सतत मुलीकडे अश्लील नजरेने पाहत राहीला. घरी आल्यानंतर मुली जवळ सुट्टे पैसे नसल्याने तिने म्हटले की, माझ्याकडे सुट्टे पैसे नाही आहे. तेव्हा ड्रायव्हरने तिला डोळ्यांनी अश्लील चाळे करीत इशारे केले. सदर घटना तिने तिच्या आईला रात्री सांगितल्यानंतर तिच्या कुटुंबीयांनी आरे पोलीस स्टेशनमध्ये येऊन ओला टॅक्सी ड्रायव्हर विरोधात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी पथक स्थापन करून आरोपीला अटक करण्यात आली आहे.



पोलिसांनी केली अटक : याप्रकरणी आरे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर डोंबे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय सचिन पांचाळ व त्यांच्या पथकाने परिसरात लावलेले सीसीटीव्ही फुटेज आणि ओला टॅक्सी कॅबचे बुकिंग यावरून आरोपीला पकडले. मुरारी कुमार सिंग (29) याला भगतसिंगनगर नयानगर गोरेगाव पश्चिम येथून अटक करण्यात आली आहे. मुरारीने गुन्ह्याची कबुली दिली आहे. सध्या मुरारी सिंह 30 मेपर्यंत पोलिस कोठडीत आहे.



हेही वाचा :Molesting Minor Girl : वसईत अल्पवयीन मुलीचा विनयभंग, मौलानाला नागिरकांनी चोप देत केले पोलिसांच्या स्वाधीन

ABOUT THE AUTHOR

...view details