मुंबई -कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर अनलॉक सुरु झाल्यानंतर मुंबईतील सर्वसामान्य नागरिकांना १५ ऑगस्टपासून उपनगरीय रेल्वे प्रवासास मुभा देण्यात आली आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याबाबतची घोषणा करताना लसघेतल्या पासधारकांना ही मुभा असल्याचे स्पष्ट केले. त्यानुसार, नागरिकांना लोकल रेल्वे प्रवास करणे सोयीचे व्हावे, त्यांना मासिक रेल्वे प्रवास पास मिळावा, यासाठी कोविड लसीकरण पूर्ण झाल्याची ऑफलाइन पडताळणी प्रक्रिया आजपासून(बुधवारी) सुरू झाली आहे. याचा आढावा घेतला आहे ईटीव्हीचे प्रतिनिधी अक्षय गायकवाड यांनी
लोकलचा पास मिळावा यासाठी ऑफलाईन प्रक्रिया सुरू, पहिल्याच दिवशी गोंधळ
कोविड लसीकरण पूर्ण झालेल्या पात्र नागरिकांना दिनांक १५ ऑगस्ट २०२१पासून लोकल रेल्वे प्रवास करता येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. त्यासाठी ऑनलाइन अॅपद्वारे तसेच ऑफलाइन अशा दोन्ही रितीने सुविधा पुरवली जाणार आहे. अॅप तयार करून ऑनलाइन प्रक्रिया सुरू करण्याची तयारी ही सुरू आहे.
लसीचे दोन डोस घेतलेल्या नागरिकांना विशेष पास देण्यात येणार आहे. या पासधारकांना लोकलने प्रवास करण्यास मुभा देण्यात आली आहे. हे पास ऑफलाईन देखील उपलब्ध करून देण्यासाठी 50 पेक्षा जास्त रेल्वे स्थानकांवर सोय करण्यात आली आहे. सकाळी 7 ते रात्री 11पर्यंत हे पास देण्याचे काम सुरू असणार आहे. पहिल्या दिवशी काही काळ गोंधळ उडाल्याचे दिसून झाला सकाळी सातचा वेळ देण्यात आला होता. मात्र प्रक्रिया साडेआठ पासून सुरू झाली. यामुळे काही काळ या ठिकाणी लोकांमध्ये गोंधळ निर्माण झाला होता.
सर्वसामान्य मुंबईकरांसाठी लोकलता प्रवास 15 ऑगस्टपासूनच सुरू होणार आहे. कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका टाळण्याच्या दृष्टीकोणातून मुंबईकरांना लोकल प्रवासासाठी काही नियम आणि निर्बंध घालून देण्यात आले आहेत. त्यानुसार बुधवारपासून प्रवास पात्र प्रवाशांची फक्त पडताळणी सुरू झालेली आहे, ज्यांचे रजिस्टेशन पूर्ण झालेले आहे. त्यांना 15 ऑगस्टपासून रेल्वे पास मिळणार आहे. आजपासून पालिकेकडून पडताळणी सुरू झालेली आहे.