महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Mar 28, 2022, 3:21 PM IST

ETV Bharat / city

Bank Employees Strike in MH : खासगीकरणाविरोधात बँकिंग संघटनांचे पदाधिकारी आझाद मैदानावर आले एकत्रित

महाराष्ट्र राज्य बँक कर्मचारी संघटनेचे जनरल सेक्रेटरी देवीदास तुळजापूरकर म्हणाले की, आमचा संप मुख्यत: बँकांच्या खासगीकरणाचा विरोधात आहे. केंद्र सरकारने बँकिंग कायदा दुरुस्ती विधेयकाचे कोणत्याही वेळी कायद्यात रुपांतर होऊ शकते. त्यामुळे आम्हाला भीती ही आहे की या देशातील सर्वसामान्य लोकांनी आपला घाम गाळून, रक्त सांडून जमा केलेली 100 लाख कोटींहून अधिकची बचत असुरक्षित होईल.

बँकिंग कर्मचारी संप
बँकिंग कर्मचारी संप

मुंबई - मागील काही वर्षे तुम्ही बँकांच्या खासगीकरणासंबंधातील बातम्या वाचत, पाहात किंवा ऐकत असाल. या काळात अनेक बँकांचे खासगीकरणदेखील झाले. मात्र, या विरोधात सर्व बँकिंग कर्मचारी संघटना एकवटल्या आहेत. या खासगीकरणाविरोधात आता आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. आपल्या विविध मागण्यांसाठी हे सर्व बँकिंग संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते केंद्र सरकारच्या धोरणाविरोधात आझाद मैदानात एकवटले आहेत.

100 लाख कोटींहून अधिकची बचत असुरक्षित
महाराष्ट्र राज्य बँक कर्मचारी संघटनेचे जनरल सेक्रेटरी ( state Bank Employees Union General Secretary ) देवीदास तुळजापूरकर ( Devidas Tuljapurkar on Bank strike ) म्हणाले की, आमचा संप मुख्यत: बँकांच्या खासगीकरणाचा विरोधात ( strike against privatization of bank ) आहे. केंद्र सरकारने बँकिंग कायदा दुरुस्ती विधेयकाचे ( Banking Law Amendment Bill ) कोणत्याही वेळी कायद्यात रुपांतर होऊ शकते. त्यामुळे आम्हाला भीती ही आहे की या देशातील सर्वसामान्य लोकांनी आपला घाम गाळून, रक्त सांडून जमा केलेली 100 लाख कोटींहून अधिकची बचत असुरक्षित होईल. बुडणाऱ्या खासगी बँका या सरकारने सार्वजनिक क्षेत्रात आणून या सरकारने वाचवल्या आहेत. मात्र, आता त्याच बँकांचे हे लोक पुन्हा एकदा खासगीकरण करत आहेत.

हेही वाचा-Changes From 1 April: जीएसटी, म्युच्युअल फंड, गुंतवणुक आणि पीएफवरील करांसह 10 नियमांत होणार बदल

हा संप आमच्या पगारवाढीसाठी नाही
पुढे बोलताना तुळजापूरकर म्हणाले की, हा संप आमच्या पगारवाढीसाठी नाही किंवा आमच्या भल्यासाठी नाही. आम्ही हा संप सामान्य माणसाच्या भल्यासाठी करत आहोत. बँकांचे खाजगीकरण झाले तर सामान्य माणसाचीच ठेवी असुरक्षित होणार आहेत. आम्हाला माहिती आहे आमच्या संपामुळे लोकांना त्रास होतोय त्याबद्दल आम्ही त्यांची माफी मागतो, असे तुळजापूरकर यांनी म्हटले

ABOUT THE AUTHOR

...view details