महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Ganesh Chaturthi 2022 गणेश चतुर्थी निमित्ताने मुंबईत सिद्धिविनायक दर्शनाला येताय, मग त्याआधी अजून घ्या मंदिराबाबत ही महत्त्वाची माहिती - Siddhi Vinayak Mumbai darshan

गणपती म्हणजे सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा सण. या उत्सवाची तयारी जवळपास महिनाभर अगोदरच सर्वांच्या घरी सुरू झालेले असते. जरी घरी गणपती असला तरी सगळ्यांना उत्सुकता असते, ती मुंबईतील गणपती पाहण्याची. अशात अनेक गणेश भक्तांची मुंबईतील प्रसिद्ध अशा सिद्धिविनायक मंदिरात Shree Siddhivinayak Ganpati Temple बाप्पाचे दर्शनासाठी Siddhi Vinayak Mumbai darshan जाण्याची इच्छा असते. मुंबईतील सिद्धिविनायक मंदिर हे गणेशाच्या सर्वात प्रसिद्ध मंदिरांपैकी एक आहे. तेव्हा तुम्हाला देखील या मंदिराला गणपती उत्सवात भेट द्यायची असेल तर ही माहिती important information about the temple खास तुमच्यासाठी आहे. Ganesh Chaturthi 2022

Ganesh Chaturthi 2022
मुंबईत सिद्धिविनायक दर्शन

By

Published : Aug 29, 2022, 5:50 PM IST

मुंबई गणपती म्हणजे सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा सण. या उत्सवाची तयारी जवळपास महिनाभर अगोदरच सर्वांच्या घरी सुरू झालेले असते. जरी घरी गणपती असला तरी सगळ्यांना उत्सुकता असते, ती मुंबईतील गणपती पाहण्याची. अशात अनेक गणेश भक्तांची मुंबईतील प्रसिद्ध अशा सिद्धिविनायक मंदिरात Shree Siddhivinayak Ganpati Temple बाप्पाचे दर्शनासाठी Siddhi Vinayak Mumbai darshan जाण्याची इच्छा असते. मुंबईतील सिद्धिविनायक मंदिर हे गणेशाच्या सर्वात प्रसिद्ध मंदिरांपैकी एक आहे. तेव्हा तुम्हाला देखील या मंदिराला गणपती उत्सवात भेट द्यायची असेल तर ही माहिती important information about the temple खास तुमच्यासाठी आहे. Ganesh Chaturthi 2022


दोन शतकांचा इतिहाससिद्धिविनायक, भगवान गणेशाचे सर्वात लोकप्रिय रूप, मुंबई, महाराष्ट्र येथे स्थित आहे. गणपतीची सोंड उजवीकडे वळलेली असल्यामुळे या गणपतीच्या रूपाला सिद्धिविनायक असे नाव पडले आहे. हिंदू धर्मात उजव्या सोंडेचा गणपती हा अतिशय कडक व जागृत मानला जातो. या गणपतीची पूजा देखील तितकीच शास्त्रोक्त करावी लागते. त्यामुळे सहसा जेव्हा घरात गणपतीची प्रतिष्ठापना केली जाते, तेव्हा उजव्या सोंडेचा गणपती लोक घेत नाहीत. गणेशाची अशी मूर्ती असलेले मंदिर हे सिद्धपीठ मानले जाते. त्यामुळे या मंदिराला सिद्धिविनायक म्हणतात. विनायक हे देखील गणेशाचे एक नाव आहे. सिद्धिविनायक मंदिर 19 नोव्हेंबर 1801 रोजी बांधले गेले. असा या मंदिराचा दोन शतकांचा इतिहास आहे.



दर्शनाला कसं जालमुंबईत तुम्ही लोकल ट्रेन किंवा कॅब आणि बसने दक्षिण मुंबईकडे जाता. तुम्हाला लोकल ट्रेनमधून सिद्धिविनायक मंदिर गाठायचे असेल, तर आधी दादर रेल्वे स्टेशन गाठावे, तेथून तुम्ही टॅक्सीने प्रभादेवीला जाऊ शकता. इथून शेअर टॅक्सी मिळतील. मात्र, तुम्ही स्टेशनवरून चालत मंदिरातही जाऊ शकता. दादर स्टेशनपासून मंदिराचे अंतर अवघ्या 15 मिनिटांचे आहे.


दर्शनाची वेळसिद्धिविनायक मंदिर सकाळी 5:30 ते रात्री 9:50 पर्यंत भाविकांसाठी दर्शनाला खुले असते. यावेळी भाविक दर्शनासाठी मंदिरात येऊ शकतात. मंगळवारी सिद्धिविनायक मंदिरात मोठी गर्दी असते. त्यामुळे मंगळवारी मंदिरात जायचे असेल तर गर्दीसाठी तयार राहा.



प्रवेश कसा मिळेलसिद्धिविनायक मंदिरात प्रवेश करण्यासाठी दोन मार्ग आहेत. तुम्ही सिद्धी द्वार आणि रिद्धी द्वार मार्गे मंदिरात जाऊ शकता. सिद्धी गेटमधून मोफत प्रवेश दिला जातो, पण या गेटवर खूप गर्दी असते. त्याचबरोबर रिद्धी गेटवर कमी गर्दी असते. या दरवाजातून मंदिरात प्रवेश करण्यासाठी प्रवेश शुल्क भरावे लागते. जर कमी वेळ असेल आणि दर्शनासाठी लांब रांगेत उभे राहायचे नसेल तर पैसे भरून दर्शनाचा हा पर्याय अवलंबू शकता. याशिवाय ज्येष्ठ नागरिक, लहान मुले असलेल्या माता, अनिवासी भारतीय आणि दिव्यांगांसाठी मंदिरात प्रवेश करण्याची विशेष व्यवस्था आहे. Ganesh Chaturthi 2022

हेही वाचाGanesh Chaturthi Puja 2022 बुधवारी या शुभ मुहूर्तावर होणार गणेशाचे आगमन

ABOUT THE AUTHOR

...view details