मुंबई -बाळाची विक्री करून घेणाऱ्या मुलाचे पालन पोषणाची जबाबदारी ही दत्तक घेणाऱ्या आई-वडिलांची असणार आहे, असे महत्त्वपूर्ण मत मुंबई न्यायालयाने व्यक्त केले आहे. मुंबई पोलिसांनी नवजात बाळांची विक्री करणाऱ्या टोळीला गजाआड केले होते. क्राईम पोलिसांनी केलेल्या या कारवाईनंतर सुरु असलेल्या न्यायलयीन खटल्यादरम्यान महत्त्वपूर्ण निर्देश मुंबई कोर्टाने दिले आहेत.
दत्तक घेतलेल्या मुलाप्रकरणी वडिलांना अटक करण्यात आली - विक्री करुन दत्तक घेतलेल्या मुलांचा ताबा त्याच पालकांकडे दिला जावा असं कोर्टानं म्हटलं आहे. सहा अल्पवयीन मुलांना पोलिसांनी रेस्क्यू केलं होतं. या मुलांची विक्री करण्यात आल्याचा संशय पोलिसांना होता. याप्रकरणी मुलं ज्यांच्याकडे आढळून आली होती त्यांपैकी काही जणांना अटकही करण्यात आलेली. याप्रकरणातील एका मुलाबाबत सुनावणी देताना दत्तक घेतलेल्या मुलाप्रकरणी एका वडिलांना अटक करण्यात आली होती. त्याच्यावर पैसे देऊन या मुलाची खरेदी केली असल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. दरम्यान काही मुलांचं रेस्क्यू करताना अनेक पालकांनी मूल दत्तक घेण्याची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली नसल्याचंही पोलिसांच्या कारवाईत दिसून आलं होतं. अखेर आता याप्रकरणी कोर्टानं महत्त्वाचे निर्देश दिलेत.
मुलाचा ताबा पूर्ण वेळ मिळावा यासाठी याचिका - अचानक एक दिवस त्यांना पोलिसांचा फोन आला आणि त्यांनी या विक्री केलेल्या बाळाच्या खरेदी केल्याचा आरोप आमच्यावर लावला गेला, असं कोर्टात सांगितले. जानेवारी 2021 मध्ये मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रांचने नवजात बाळांची खरेदी-विक्री करणाऱ्या एका टोळीचा पर्दाफाश केला होता. त्यानंतर एका मुलीची 60 हजाराला तर लहान मुलाही दीड लाखाला विक्री करण्यात आल्याचे तपासातून समोर आले होते. पोलिसांनी तशी चार्जशीटही मार्च 2021 मध्ये दाखल केली होती. त्यानंतर 18 महिन्यांनी नवजात बाळांची विक्री करणाऱ्या रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केला होता. दरम्यान, पोलिसांनी लावलेल्या आरोपांचे खंडन करत दाम्पत्याने या मुलाचा ताबा पूर्ण वेळ मिळावा यासाठी उच्च न्यायालयात दाद मागितली असल्याचेही म्हटले आहे.