मुंबई - ओबीसी आरक्षणासाठी राज्य सरकारने मागासवर्गीय आयोगाची स्थापना केली होती. मात्र या आयोगाला कामच करु दिले नसल्याचा आरोप आयोगाचे सदस्य करत आहेत. त्याला छगन भुजबळ यांनी ट्विटच्या माध्यमातून उत्तर दिले आहे. आयोगाच्या कार्यपद्धतीला आम्ही विरोध केला होता, असे ट्विटच छगन भुजबळ यांनी केले आहे. त्यावरुन आयोगाचे सदस्य आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांमधील वाद आणखी वाढण्याची शक्यता आहे.
आडनावरून केली जात होती माहिती गोळा -ओबीसी आरक्षणासाठी स्थापन करण्यात आलेल्या आयोगाच्या वतीने इम्पेरिकल डाटा गोळा करण्यात येत होता. मात्र त्याला महाविकास आघाडीतील काही नेत्यांनी विरोध केल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. त्यातच आता पुण्य़ातील आयोगाच्या सदस्यांनी आम्हाला कामच करू न देण्यात आल्याचा आरोप महाविकास आघाडीवर केला. त्यावर आयोगाच्या वतीने आडनावरून माहिती गोळा केली जात होती. यात सत्य माहिती समोर येणार नाही, अशी भीती होती. त्यामुळे आयोगाच्या कार्यपद्धतीला आम्ही विरोध केल्याचेही छगन भुजबळ यांनी सांगितले.