महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Women Special Bus गर्दीची चिंता नको! बेस्ट वाढविणार महिला स्पेशल बसची संख्या - increased In Mumbai

Women Special Bus बेस्टच्या बसमधून लाखो प्रवासी प्रवास करतात. त्यात महिला प्रवाशांची संख्याही मोठी आहे. महिला प्रवाशांसाठी बेस्टकडून ( Women Special Bus ) विशेष बसेस चालवल्या जातात. मात्र या बसेसची संख्या कमी असल्याने, त्यात वाढ करण्याची मागणी केली जात आहे. या अनुषंगाने पिक हार्वसमध्ये महिला स्पेशल बसेसची संख्या वाढवण्यात येणार असल्याची माहिती बेस्ट उपक्रमाचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्र यांनी दिली.

Best Buses
Best Buses

By

Published : Sep 18, 2022, 9:17 PM IST

मुंबईबेस्टच्या बसमधून लाखो प्रवासी प्रवास करतात. त्यात महिला प्रवाशांची संख्याही मोठी आहे. महिला प्रवाशांसाठी बेस्टकडून ( Women Special Bus ) विशेष बसेस चालवल्या जातात. मात्र या बसेसची संख्या कमी असल्याने, त्यात वाढ करण्याची मागणी केली जात आहे. या अनुषंगाने पिक हार्वसमध्ये महिला स्पेशल बसेसची संख्या वाढवण्यात येणार असल्याची माहिती बेस्ट उपक्रमाचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्र यांनी दिली.

महिला विशेष गाड्या बेस्ट बसने सुमारे ३० लाख प्रवासी प्रवास करतात. कामाच्या वेळेत म्हणजेच सकाळी आणि सायंकाळी बसमध्ये प्रवाशांची गर्दी असते. यावेळी होणारी धक्काबुक्की लक्षात घेऊन बेस्टने महिलांसाठी विशेष बसेस सुरु केल्या होत्या. मार्च २०२० मध्ये कोरोनाचा प्रसार सुरु झाल्यावर बेस्टने आरोग्य आणि ( Women Special Bus ) फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांसाठी विशेष बस सेवा चालवले आहेत. या कालावधीत महिला प्रवाशांची संख्या कमी असल्याने महिलांसाठी चालवली जाणारी बस सेवा बंद करण्यात आली होती. ( Women Special Bus )कोरोनाचा प्रसार कमी होताच कामानिमित्त घराबाहेर पडणाऱ्या महिलांची संख्या वाढू लागली आहे. या पार्श्वभूमीवर बेस्ट उपक्रमाने महिला विशेष गाड्यांची संख्या वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.

बसची संख्या वाढवणार बेस्टमधील प्रवाशांना चांगली सुविधा देता यावी, यासाठी पर्यावरणपूरक इलेक्ट्रिक वातानुकूलित बस चालवल्या जात आहेत. येत्या काळात वातानुकूलित बसेसची संख्या वाढीवर भर दिला आहे. बेस्ट बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये महिला प्रवाशांसाठी सध्या १०० बसेस ७० मार्गावर पिक हार्वसमध्ये चालवल्या जात आहेत. महिला विशेष बसेसची संख्या वाढवा अशी मागणी महिला प्रवाशांकडून सतत होत आहे. त्यामुळे पिक हार्वसमध्ये महिला स्पेशल बसची संख्या वाढवण्यात येणार आहे. पिक हार्वस मध्ये फक्त महिला प्रवाशांसाठी ही बस सेवा उपलब्ध असेल, असे लोकेश चंद्र यांनी सांगितले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details