महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

मेट्रोची प्रवासी संख्या पोहोचली एक लाख १० हजारांवर, सोमवारपासून दररोज धावणार 280 फेऱ्या - मुबंई मेट्रो

वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर या मार्गावर धावणारी मेट्रो-1 ची दररोजची प्रवासी संख्या 1 लाख 10 हजारावर पोहचली आहे. आता मेट्रोच्या प्रवाशांचे गर्दीचे विभाजन करण्यासाठी मेट्रो प्रशासनाने सोमवारपासून 256 ऐवजी आता 280 मेट्रो फेऱ्या दररोज धावणार आहेत

mumbai metro passengers
mumbai metro passengers

By

Published : Mar 20, 2021, 6:45 PM IST

मुंबई - वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर या मार्गावर धावणारी मेट्रो-1 ची दररोजची प्रवासी संख्या 1 लाख 10 हजारावर पोहचली आहे. आता मेट्रोच्या प्रवाशांचे गर्दीचे विभाजन करण्यासाठी मेट्रो प्रशासनाने सोमवारपासून 256 ऐवजी आता 280 मेट्रो फेऱ्या दररोज धावणार आहेत, अशी माहिती मेट्रो प्रशासनाकडून देण्यात आली.

दररोज 280 फेर्‍या धावणार -

मुंबईची जीवनवाहिनी सुरू झाल्याने मुंबईची गती वाढली आहे. सर्वसामान्य प्रवाशांचा प्रवास सुरू झाला आहे. त्यामुळे अन्य पर्यायी वाहतुकीची प्रवासी संख्या वाढली आहे. लॉकडाऊन काळात मेट्रो सेवा बंद करण्यात आली होती. मात्र, त्यानंतर 19 ऑक्टोबर रोजी अनलॉकमध्ये मेट्रोची सेवा सुरू करण्यात आली. यावेळी मेट्रोमध्ये दररोज साधारण 80 हजार प्रवासी प्रवास करत होते. 1 फेब्रुवारी रोजी सुमारे दिवसभरात सुमारे 90 हजार प्रवाशांनी प्रवास केला. तर, 8 फेब्रुवारी रोजी 1 लाखांवर प्रवासी संख्या पोहचली आहे. त्यामुळे प्रवाशांची गर्दी विभाजित करण्यासाठी सोमवार ते शुक्रवारी मेट्रोच्या 256 ऐवजी आता 280 फेर्‍या चालविल्या जाणार आहेत.

प्रवासी संख्या वाढली -

कोरोना काळात मुंबईकरांना दिलासा देणाऱ्या मेट्रोच्या प्रवासी संख्येत वाढ झालेली आहे. दररोज मेट्रोतून 1 लाख 10 हजार प्रवासी प्रवास करत आहेत. कोरोना पूर्वी 4 लाख 5 हजार प्रवासी प्रत्येक दिवशी प्रवास करत होते. मात्र कोरोनामुळे ही मेट्रोची प्रवासी संख्या घटली आहे. मात्र आता पुन्हा एकदा मेट्रोच्या प्रवासी संख्येत वाढ होताना दिसून येत आहे. त्यामुळे मेट्रो प्रशासनाने मेट्रो ट्रेनच्या फेऱ्या वाढविण्याचा निर्णय घेतला आहेत. सद्यस्थितीमध्ये वर्सोवा स्थानकातून पहिली मेट्रो सकाळी सहा वाजून 50 मिनिटांनी सुटत असून घाटकोपर स्थानकातून शेवटची मेट्रो दहा वाजून 15 मिनिटांनी सुटत आहे मेट्रो सुरू होण्याच्या पंधरा मिनिटांपूर्वी मेट्रोची प्रवेश दारे खुली केली जात आहे.

सुरक्षित प्रवासासाठी मेट्रो तत्पर -

मुंबईत मागील काही दिवसापासून कोरोना विषाणूने पुन्हा एकदा डोके वर काढले असून कोरोना रुग्णाची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून मुंबई मेट्रो प्रशासनाने देखील कोरोना संसर्ग रोखण्यासाठी कठोर पावले उचललेली आहे. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाच्यावतीने तोंडावर मास्क आणि सोशल डिस्टंसिंगचे नियम पाळण्याचे अनिवार्य करण्यात आलेले आहे. प्रवाशांना सुरक्षित प्रवास देण्यासाठी मुंबई मेट्रोच्या रिस्पॉन्सनिबल, बी सेफ मोहीम सुद्धा राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत विना मास्क प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर कारवाई सुद्धा करण्यात येत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details