मुंबई :ज्येष्ठ नागरिक हे सॉफ्ट टार्गेट असल्याने ते कोणत्याही गुन्ह्याला सहज बळी पडण्याची सर्वाधिक शक्यता असते. 2021 मध्ये 60 वर्षांवरील 6190 ज्येष्ठ नागरिक विविध गुन्ह्यांचे बळी ठरले आणि NCRB (National Crime Records Bureau) च्या अहवालानुसार NCRB report on senior citizen crime एक गोष्ट समोर आली आहे की, 2020 वगळता गेल्या 5 वर्षांमध्ये महाराष्ट्रात गुन्ह्यांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. 2021 मध्ये राज्यात ज्येष्ठ नागरिकांसोबत घडलेल्या गुन्ह्यांची 6190 प्रकरणे Senior Citizen Crime Ratio Maharashtra नोंदवली गेली.
महाराष्ट्रात गुन्ह्यांच्या नोंदीमध्ये होणारी वाढ चिंताजनक : महाराष्ट्रात गुन्ह्यांच्या नोंदीमध्ये सातत्याने होणारी वाढ ही राष्ट्रीय प्रवृत्तीचे प्रतिबिंब आहे. महाराष्ट्रात 2017 मध्ये गुन्ह्यांची 5321 आणि 2018 मध्ये 5961 प्रकरणे नोंदवली गेली. त्या कालावधीत, गुन्ह्यांचा राष्ट्रीय पातळीवरी आकडा 21,866 वरून 23,501 वर पोहोचला. 2019 नंतर 2021 मध्ये पुन्हा एकदा ज्येष्ठ नागरिकांवरील गुन्ह्यांच्या आकडेवारीने 6000 चा टप्पा पार केला आहे.
'ही' आहे धक्कादायक आकडेवारी -
2019: 2018 मध्ये 5961 गुन्ह्यांच्या तुलनेत 2019 मध्ये महाराष्ट्रात ज्येष्ठ नागरिकांवरील गुन्ह्यांची एकूण 6163 प्रकरणे नोंदवण्यात आली असून, या संख्येत वाढ झाली आहे.
2020:महाराष्ट्रात 2020 मध्ये ज्येष्ठ नागरिकांवरील गुन्ह्यांच्या एकूण 4909 गुन्ह्यांची नोंद झाली आहे. त्या तुलनेत 2019 मध्ये 6163 गुन्ह्यांची नोंद झाली आहे, जी संख्या कमी दर्शवते.